महाराष्ट्र राज्य ग्रामीण पञकार संघाच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी शंकर नाबदे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पञकार संघाच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी शंकर नाबदे

  नेवासा/प्रतिनिधी      महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी पत्रकार शंकर नाबदे यांची तर उपाध्यक्षपदी ...

 

नेवासा/प्रतिनिधी 


   

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी पत्रकार शंकर नाबदे यांची तर उपाध्यक्षपदी रमेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

मंगळवार दिनांक 18 मे रोजी नेवासा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे,सचिव अनिल कोळसे,जिल्हा कार्याध्यक्ष संतोष जाधव,राहुरी तालुका अध्यक्ष गोविंद फुणगे, यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.नेवासा तालुका मावळते तालुकाध्यक्ष पञकार अशोक तुवर यांच्या सुचनेनुसार झालेल्या बैठकीत  हि निवड प्रक्रिया पार पडली आहे.यावेळी जेष्ठ पञकार सुधीर चव्हाण, अहमदनगर जिल्हा दक्षिण सरचिटणीस मकरंद देशपांडे,पञकार सुहास पठाडे,मोहन गायकवाड,पवन गरूड,विलास धनवटे, आदि पञकार उपस्थित होते. आणि नेवासा तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व तळागाळातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा ग्रामीण पञकार संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष नाबदे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत