अकोलेत सापळा ; खाकीला पुन्हा डाग ! वाचा कोण अडकलं जाळ्यात..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अकोलेत सापळा ; खाकीला पुन्हा डाग ! वाचा कोण अडकलं जाळ्यात..!

  अकोले : प्रतिनिधी  अँटी करप्शनच्या जाळ्यात पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे आज अलगद अडकला.नाशिक विभागाने अकोल्यात लाचलुचपत प्रतिबंधक ने छ...

 


अकोले : प्रतिनिधी 


अँटी करप्शनच्या जाळ्यात पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे आज अलगद अडकला.नाशिक विभागाने अकोल्यात लाचलुचपत प्रतिबंधक ने छापा घालून ५000 हजार ची लाच घेताना पोलीस पांडे याला ताब्यात घेतले.अकोले तालुक्यातील अकोले पोलीस स्टेशन येथे सेवारत असणाऱ्या पांडे या पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.



संगमनेर येथील  एक तक्रारदार असून त्यांचे साडु व त्यांच्या दोन मुलांच्या विरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात दोन आरोपी विरुद्ध चॅप्टर केस लवकर करुन त्यांचा लगेच जामीन करुन देणे साठी व त्यातील उर्वरित एक आरोपीचे विरुद्ध चॅप्टर केस न करता त्याचे नाव गुन्ह्यतून नाव कमी करण्यासाठी आरोपी लोकसेवक पोलीस नाईक पांडे यांने ५,000/- रु लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अहमदनगर विभागाकडे दिलेल्या तक्रारी वरुन केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांच्याचकडे ५000/- रु लाचेची मागणी पंचा समक्ष केल्याचे उघड  झाले.


आज दि.१८ रोजी अकोले पोलीस स्टेशन येथे आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक यांनी ५000/- रु लाचेची रक्कम पंचा समक्ष स्व?स्वीकारली असता आरोपी पोलीस नाईक पांडे यास रंगेहाथ पकडण्यात आले.श्री सुनील कडासने ( पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक) .श्री निलेश सोनवणे ( अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक),विजय जाधव, (वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.) यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी दीपक करांडे, (पोलिस निरीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर )सुपरविजन अधिकारी हरिष खेडकर, (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर) यांनीं ही कारवाई केली.


दरम्यान, अकोले पोलीस स्टेशनमध्ये अँटिकरप्शन जाळ्यामध्ये पोलीस अडकण्याची वर्षभरतील ही दुसरी घटना आहे. तर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे यापूर्वीच तालुक्याचा गटविकास अधिकारी एका कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडला गेला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत