वादळाचा फटका ग्रामीण भागालाही ;फळबाग, शेतीमालाचे मोठे नुकसान, पंचनाम्याची मागणी ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वादळाचा फटका ग्रामीण भागालाही ;फळबाग, शेतीमालाचे मोठे नुकसान, पंचनाम्याची मागणी !

  सात्रळ : प्रतिनिधी    तौक्ते  वादळाचा फटका ग्रामीण भागातही मोठया प्रमाणावर  दिसून येत असून बळीराजाला  डोक्याला हाथ लावून बसण्याची पाळ...

 


सात्रळ : प्रतिनिधी   


तौक्ते  वादळाचा फटका ग्रामीण भागातही मोठया प्रमाणावर  दिसून येत असून बळीराजाला  डोक्याला हाथ लावून बसण्याची पाळी आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे  फळबाग उत्पादकांचे  मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळत आहे.

जोराच्या वाऱ्यामुळे डाळिंब, आंबा,  निमोनी आदि फळांचे  मोठया प्रमाणात फळे गळून  पडले असुंकही ठिकाणी तर वेगवान  वाऱ्यामुळे फळझाडे उन्मळून पडली आहेत. आंबा पीक  विशेतः  केशर, हापूस, लंगडा या जातींचे काढणीस आलेली फळे वाऱ्यामुळे  गळून पडले असून बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून  घेतलेला आहे. परिसरात  अद्यावत वार्थीक सुधारित शेट प्रयोगांतर्गत  अनेक शेतकऱ्यांनी  फळबाग लागवड केलेली असून त्यास निसर्गाच्या या वादळी  फटकाने  अतोनात नुकसान झाले असून तालुका प्रशासनाने  झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी परिसरातील फळबाग उत्पादकांच्या वतीने  विश्वासराव कडू,  संजय नागरे, वसंतराव  डुकरे पाटील, किशोर  कडू, गणेश कडू, उदयराज कडू,  दौलत नागरे,  आदी  नी केली आहे. तसेच या वादळाने इतर चार पिके, भाजीपाला याचे ही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच  या झालेल्या नुकसान ज्या फळबाग उप्त्पादक शेतकऱ्यांचे  फळबागांचे विमा उतरविला नाहीत त्यांनाही  राष्ट्रीय आपत्ती  निधीतून भरपाई  मिळावी ही मागणी  बळीराज्याकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत