कोपरगाव : शहर प्रतिनिधी- सध्या चालू आसणाऱ्या कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये दिवसोंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे त्याच बरोबर मृत आकडा...
कोपरगाव : शहर प्रतिनिधी-
सध्या चालू आसणाऱ्या कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये दिवसोंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे त्याच बरोबर मृत आकडा सुद्धा त्याच झपाट्याने वाढत आहे अशा या कठिण परिस्थितीमध्ये नगरपालीकेचे कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच महान कार्य करत आहे. पण दररोजची वाढती मृत्यू संख्या विचारत घेता अंत्यविधी साठी लागणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या, लाकडं मिळणे कठीण झाले आहे त्याच अनुषंगाने आपण सुद्धा समाजाचे काही देणं लागतो या उद्देशाने एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ कोपरगाव व सेवा प्रतिष्ठाण कोपरगाव यांच्या मार्फत कोपरगाव येथील अमरधाम ला एक मदतीचा हात म्हणून आम्ही आपल्या सर्वांच्या सोबतीने अंत्यसंस्काराला लागणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांच्या मदतीने जमा करून कोपरगाव अमरधाम पर्यंत पोहोच करणे हा उपक्रम राबविण्याचे ठरविले असून आपण सर्वांनी या कार्यास हातभार लावावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष जाधव व सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष कृष्णा आढावा यांनी केले आहे.
या वेळी जाधव यांनी सांगितलेV की,आपल्याला शक्य होईल तितक्या शेणाच्या गोव-या किंवा अंत्यविधी साठी लागणाऱ्या इतर साहित्याची मदत आमच्या पर्यंत दि २० मे २०२१ पर्यंत पोहचवावी आह्मी आपण दिलेली ती मदत कोपरगाव अमरधाम येथे पोहोच करू.अधिक माहितीसाठी किंवा मदत देण्यासाठी मनिष जाधव- ९८२३७५२९६४,जनार्दन जगताप- ७५८८६०२४७४, हफिज शेख- ८००७०७७३०७ विनोद जवरे- ७७५६०४५३५९, स्वप्नील कोपरे-९५२७४२४७४०, विजय कापसे- ९७६४८९९३६३,
फकिरा टेके- ९४२१५५९७७७, समाधान भुजाडे- ९०११२४५५६०, सोमनाथ डफाळ- ८७८८१९३८३९, मधुकर वक्ते- ९४०४६१५०३८, अक्षय काळे- ८८०५३४५५४९, अमोल गायकवाड- ८८३०४१९५५४ ,राहुल कोळगे ९९२२१५२०८०, बापू वढणे- ९१२३६६३८६६, प्रशांत वाबळे- ९९२२४२४८२१, कृष्णा आढाव - ७३५५५५११११, दिनेश गाडेकर - ७०३८०००९९९ या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन करत तालुक्यातुन जास्तीत जास्त मदत करावी अशी विनंती केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत