चिकन चांगलं झालं नाही ; भाच्याने काढला मामाचा काटा ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिकन चांगलं झालं नाही ; भाच्याने काढला मामाचा काटा !

  नवी दिल्ली : वेबटीम    मामानं भाच्याच घरात बनवण्यात आलेलं चिकन  हे चांगलं झालं नसल्याचं म्हटल्यानं भाच्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. आ...

  नवी दिल्ली : वेबटीम   


मामानं भाच्याच घरात बनवण्यात आलेलं चिकन  हे चांगलं झालं नसल्याचं म्हटल्यानं भाच्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. आधी दोघांमध्ये याच कारणावरुन वाद झाला. हा वाद काहीच वेळात हाणामारीत बदलला. यानंतर भाच्यानं आपल्या मामावर जबरदस्त वार करत त्याची हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीच्या लंदनपुरवा गावातील आहे

.


मंगलदीप यानं आपल्याच गावात राहणाऱ्या छोटेलाल या मामाला घरी जेवणासाठी आणि दारु पार्टीसाठी घरी बोलावलं होतं. दोघांनी आधी भरपूर दारु पिली आणि नंतर चिकन खाण्यास सुरुवात केली. यादरम्यान मामानं भाच्याला म्हटलं, की तू बनवलेला कोंबडा अजिबातही चांगला झालेला नाही. याच गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान मामानं आपल्या भाच्याला मारलं. यामुळे राग अनावर झालेल्या मंगलदीपनं आपल्या मामावर जबरदस्त वार करत त्याची हत्या केली.

या हल्ल्यात जखमी झालेल्या मामाला ताबडतोबत रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्यानं छोटेलालचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. लोकांनी पोलिसांनी या घटनेची माहिती देताच, पोलिसांनी आरोपी मंगलदीपला अटक केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत