राहुरी नगरपालिका कोरोना चाचण्यात जिल्ह्यात प्रथम ; वाचा कोणती नगरपालिका कोणत्या स्थानावर ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी नगरपालिका कोरोना चाचण्यात जिल्ह्यात प्रथम ; वाचा कोणती नगरपालिका कोणत्या स्थानावर ?

  राहुरी :  गोविंद फुुणगे कोरोना काळात कोव्हिडं चाचण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दैनंदिन सर्वाधिक चाचण्या करण्याबाबत ...

 


राहुरी : 
गोविंद फुुणगे
कोरोना काळात कोव्हिडं चाचण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दैनंदिन सर्वाधिक चाचण्या करण्याबाबत ना. प्राजक्त तनपुरे यांची राहुरी नगरपालिका प्रथम क्रमांकावर, तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची संगमनेर पालिका आठव्या क्रमांकावर फेकली गेली आहे, याशिवाय सर्वात कमी चाचण्या करणारी नगरपालिका म्हणून मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासाचे नाव गणले जाते आहे.

  जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट भयंकर सुरू आहे, त्यामुळे या कालावधीत कोव्हीड साखळी तोडणेसाठी जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करणे गरजेचे होते, यासाठी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी प्रयत्नशील असताना, नगरपालिकांवर देखील मोठी जबाबदारी होती. काही नगरपालिका प्रशासनाने चाचण्या संदभात योग्य नियोजन करून वेळेत निदान, त्यावर उपचार आणि ब्रेक द चेन या सर्व संकल्पना यशस्वीपणे राबवल्या आहेत. यात दररोज जास्तीत जास्त चाचण्या करणेत राहुरी नगरपालिका प्रथम आहे. उत्कृष्ट कामगीरीबद्दल जिल्हा प्रशासन राहुरीचे अभिमानाने नाव घेत आहे. त्या खालोखाल दुसऱ्या नंबरवर श्रीरामपूर नगरपालिका आहे, तृतीय क्रमांकावर शेवगाव नगरपालिका, चतुर्थ कोपरगाव नगरपालिका, पाचव्या क्रमांकावर शिर्डी नगरपंचायत, सहावा क्रमाकावर पाथर्डी नगरपंचायत, सातवा क्रमांक कर्जत, आठवा क्रमांक संगमनेर नगरपालिकेचा आहे. तर  
जामखेड, श्रीगोंदा आणि अकोले नगरपंचायत कामगिरी समाधानकारक आहे तर  नेवासा नगरपंचायत दररोज सरासरी  100 पेक्षा  कमी चाचण्या करणारी पालिका ठरली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत