अकोले : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांना कोठेही उपचार घेणे शक्य व्हावे या साठी राज्य सरकारने राज्यातील सर्व नागरिकांकरिता स...
अकोले : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांना कोठेही उपचार घेणे शक्य व्हावे या साठी राज्य सरकारने राज्यातील सर्व नागरिकांकरिता सद्यस्थितीत सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांना लागू करावी अशी मागणी दलित मित्र प्रकाश साळवे यांनी केली आहे.
मोफत कोरोनो उपचार देणे ही आता काळाची गरज झाली आहे. गरीब नागरिकांना पैशाअभावी कोरोनावर उपचार घेणे अवघड झाले आहे, त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य सरकारने महात्म जोतिबा फुले जन आरोग्य योजना व केंद्र सरकारनेही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे सदर कोरोना आजाराचे उपचार मोफत उपलब्ध करून नागरिकांची झालेली कोंडी फोडून आर्थिक कुचंबणा थांबवावी .
सद्यपरिस्थिती मध्ये शासनाने ठरवून दिलेल्या हॉस्पिटल मध्येच रूग्ण अॅडमिट असेल तरच त्यास महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे लाभ मिळतो मात्र इतर रुग्णालयात उपचार घेत असलेले रूग्ण अवाजवी उपचार खर्चाने मेटाकुटीस आलेले आहेत. अनेक गरीब ,शेतकरी, कामगार, कष्टकरी ,हातावर पोटभरणारा, मोलमजुरी करणारा अशा अनेक हलाखीच्या अवस्थेतील नागरिकांसाठी शासनाने निर्धारित केलेल्या व अत्यंत बोटावर मोजता येतील अशा रूग्णालयांत कधीच बेड शिंल्लक नसतात. तसेच सरकारी रुग्णालयांची उडालेली तारांबळ यामुळे अशा रूग्णांना खाजगी हॉस्पिटल मध्ये जीव वाचविण्यासाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे इतर खाजगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रूग्णांना देखील या सरकारच्या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे अशा प्रकारचा निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा, जेणेकरून अशा प्रकारच्या रूग्णांवर अन्याय होणार नाही. प याबाबतीत केंद्र सरकारनेही तातडीने निर्णय घ्यावा व
याबाबत तातडीने कार्यवाही करावी.अशी अपेक्षा व्यक्त केली, अन्यथा जनहितार्थ आपण मा.उच्च न्यायालय,खंडपीठ ,औरंगाबाद येथे शासनाच्या विरोधात याचिका दाखल करु असा इशारा प्रकाश साळवे यांनी दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत