महाविकास आघाडीच्या 'त्या' मंत्र्यांचा शिवसेनेकडून निषेध ; निळवंडेचं राजकारण पेटलं ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाविकास आघाडीच्या 'त्या' मंत्र्यांचा शिवसेनेकडून निषेध ; निळवंडेचं राजकारण पेटलं !

  अकोले -  प्रतिनिधी        शिर्डी मतदार संघात सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवून सतत जनसेवेला  अग्रक्रम देणारे, आपल्या कर्तृत्वाने निळ...

 


अकोले -  प्रतिनिधी 


     
शिर्डी मतदार संघात सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवून सतत जनसेवेला  अग्रक्रम देणारे, आपल्या कर्तृत्वाने निळवंडे धरणाच्या गेली 50 वर्षे खोळंबलेल्या कालव्यांसाठी विशेष प्रयत्न करणारे खा. सदाशिव लोखंडे यांना मतदार संघातील दौऱ्यावर न बोलाविणारे पुढारी व अधिकारी यांचा अकोले शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. 


याबाबत अकोल्याचे नगरसेवक प्रमोद मंडलिक, शिवसेना उप जिल्हा प्रमुख रामहरी तिकांडे, अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ तसेच नितीन नाईकवाडी, महेश नवले, गणेश कानवडे, नितीन देशमुख, प्रदीप हासे, संतोष मुतडक आदींनी खा. लोखंडे यांच्या कामाचा लेखाजोखा मांडताना "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही" म्हणत विकास कामांची माहिती दिली. 


 निळवंडे धरणाच्या गेली 50 वर्षे खोळंबलेल्या कालव्यांसाठी अभुतपुर्व असे शिर्डी ते मुंबई जलदिंडी आंदोलन करून खा. लोखंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले.  आपली खासदारकी पणाला लावत केंद्र सरकार मार्फत कालव्यांच्या कामांसाठी भरीव तरतूद करून निधी मिळवला, आपल्या साध्या स्वभावाने कालव्यांची कामे रोखलेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, जागेवर जाऊन वादविवाद मिटविले व पुन्हा काम चालू केले. 


निळवंडेवर दशकानूदशके  राजकारण करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांची आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या प्रस्थापितांना खा. लोखंडे यांच्या कामाची पध्दत वरचढ वाटल्याने, पहिले खासदार दिसत नाही म्हणून बदनाम करण्यासाठी प्रयत्न केले, तरी सुद्धा खासदार काहीही न बोलता आपले काम करत राहिले. खा. लोखंडे हे मतदार संघात  सतत विकास कामे करत असतात, निधी मिळवून देत असतात. नुकतेच साहेबांनी सहा नगरपालिकांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी दिला.  


खा. लोखंडे यांची कार्यपद्धती लोकाभिमुख असल्याने त्यांचे वर्चस्व वाढत चालल्याने अनेकांच्या पोटात दुखू लागले.  म्हणूनच जाणीवपूर्वक ज्या माणसाने निधी आणला त्याला न बोलावता, राजकिय शिष्टाचार न पाळता फक्त दिखावा करण्यासाठी केलेल्या पाहणी दौरा म्हणजे फुकटचे श्रेय लाटण्याचाच प्रकार आहे.  


महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत प्रमुख असून खा. लोखंडे यांचेवर विशेष मर्जी असलेले उद्भवराव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्या पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी राजकिय वागणे यापुढे तरी सोडून द्यावे व ज्यांच्या मतदार संघातील काम, ज्यांनी कालव्यांसाठी निधी मिळवला अशा  खा. लोखंडे यांचे बाबतीत शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनता मात्र या सर्वांना ओळखून आहे आणि भविष्यात कोणत्याही परिस्थितीत लोकाभिमुख काम करणारे खा. लोखंडे यांच्या बरोबरच ही जनता राहील, असा विश्वास व्यक्त करत आम्ही अकोले तालुक्यातील शिवसैनिक खा. लोखंडे यांना सदर दौऱ्यावर न बोलवणाऱ्या अधिकारी आणि सत्तेत राहून दुजाभाव करणाऱ्यांचा जाहीर निषेध करीत आहोत असे स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत