राजूर गावातील दुकानदारांनी नियमांचे पालन करावे : देशमुख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजूर गावातील दुकानदारांनी नियमांचे पालन करावे : देशमुख

        राजूर : वार्ताहर                   काही व्यापारी या कर्फ्यूच्या काळातही दुकानांचे शटर खाली करुन आपला माल विकून कोरोना पसरवित आहेत. आ...

        राजूर : वार्ताहर


                 
काही व्यापारी या कर्फ्यूच्या काळातही दुकानांचे शटर खाली करुन आपला माल विकून कोरोना पसरवित आहेत. आपलं गांव सुरक्षित ठेवायचं असेल तर व्यापारी बांधवांना कर्फ्यू काटेकोरपणे पाळावा लागणार आहे.  जर कुणी व्यापारी बांधव शटर खाली करुन माल विकून कोरोना पसरवणार असतील तर त्यांच्या विरुद्ध अतिशय कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सरपंच गणपत देशमुख यांनी दििला

.     गावात आपण सर्वांनुमते जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूचा आज पाचवा दिवस आहे. असे असूनही आपल्या गांवात  व  शेजारच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. मागील ३ दिवसात आपल्याकडे ३९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एका व्यक्तीला वेळेवर ऑक्सीजन मिळाला नाही म्हणून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर एका व्यक्तीला उपचार मिळूनही आपले प्राण गमवावे लागले आहेत.आपण सर्वांनी लोकवर्गणीतून सुरु केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये मागील ३ दिवसांतच ६३ रुग्ण उपचार घेत आहेत म्हणजेच कोरोना खूप वेगाने आपल्या गांवात व शेजारच्या परिसरात वाढत आहे.                                                        ही महामारी भयंकर असूनही आपण गांभीर्याने घेत नाही असा त्याचा अर्थ होत आहे. असे लक्षात आले आहे की,काही व्यापारी या कर्फ्यूच्या काळातही दुकानांचे शटर खाली करुन आपला माल विकून कोरोना पसरवित आहेत. आपलं गांव सुरक्षित ठेवायचं असेल तर व्यापारी बांधवांना कर्फ्यू काटेकोरपणे पाळावा लागणार आहे. काही लबाड व्यापा-यांनी जर कर्फ्यू व्यवस्थित पाळला नाही तर त्याचे परिणाम गांवाला भोगावे लागणार आहेत आणि यासाठीच विनंती करतो की कर्फ्यू न पाळता जर कुणी व्यापारी बांधव शटर खाली करुन माल विकून कोरोना पसरवणार असतील तर त्यांच्या विरुद्ध अतिशय कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे सरपंच गणपत देशमुख यांनी सांगितले.

< /p>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत