राहुरी : प्रतिनिधी सध्या कोरोना या महामारीने जगभर थैमान घातले असून सर्वच स्तरावर त्याला रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत,सध्...
राहुरी : प्रतिनिधी
सध्या कोरोना या महामारीने जगभर थैमान घातले असून सर्वच स्तरावर त्याला रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत,सध्याच्या या काळात आपल्याला ऑक्सिजन चे महत्त्व लक्षात घेता झाडांची महती कळते आहे.या साठी दीर्घकालीन उपाय योजना होणे खूप गरजेचे आहे, त्या अनुषंगाने वृक्ष लागवड करणे व त्यांचे संगोपन करणे हे येणाऱ्या पिढी च्या भविष्यासाठी व कोरोना वर मात करण्यासाठी वातावरणात भरपूर ऑक्सिजन असणे मानव जाती साठी कल्याणकारक ठरणार आहे, असेच केंदळ बु येथील युवक वृक्ष लागवड करून निसर्ग,पर्यावरणाची निगा राखताना दिसत आहे.
पर्यावरण क्षेत्रात चांगले कार्य करत असलेल्या केंदळ बु येथील संवर्धन फाउंडेशनने गावातील ठिकाणे, मंदिर परिसर,स्मशान भूमी,शाळा परिसर तसेच ग्राम दैवत श्री, विरभद्र महाराज मंदिर परिसर येथे सोमनाथ भांड, अविनाश यादव,नवनाथ कैतके,जनार्दन तारडे,शैलेश डोंगरे, बापूसाहेब भुसे,रामेश्वर तारडे,योगेश तारडे हे निसर्ग प्रेमी युवक श्रमदानातून वृक्ष लागवड करून वनराई फुलविण्याचे कार्य करत आहेत व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपले योगदान देत आहेत. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो याला अनुसरून आपले वृक्ष लागवडीचे कार्य अविरत पणे करत असतात, त्यासाठी त्यांना ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभते आहे.तसेच त्यांनी बी संकलन करून त्याची लागवड जनतेला आव्हान केले आहे की ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी पावसाळ्या पूर्वी बी,रोपे संवर्धन फाउंडेशन कडे जमा करावीत ती रुजवून त्याची रोपे बनवून लागवड करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना शक्य असेल तेवढी झाडांची लागवड या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने करावी व आपले निसर्ग संवर्धनसाठी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत