कोपरगाव पालिकेची कोविड तपासणी मोहीम ; ७३ विक्रेत्यांच्या रॅपिड टेस्ट, दोघे पॉझिटिव्ह - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव पालिकेची कोविड तपासणी मोहीम ; ७३ विक्रेत्यांच्या रॅपिड टेस्ट, दोघे पॉझिटिव्ह

  कोपरगाव : प्रतिनिधी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अद्यापही शहरासह ग्रामीण भागात कोरोन...

 


कोपरगाव : प्रतिनिधी


गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अद्यापही शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर संक्रमण रोखण्यासाठी कोपरगाव पालिकेने शनिवारपासून (ता.१५) भाजीपाला, फळ विक्रेते व ग्राहकांची जागेवरच रॅपिड अँटिजेन टेस्ट व आरटीपीसीआर तपासणी मोहीम सुरू केली आहे. 


सदर मोहीम मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि स्थानिक कोरोना सुरक्षा समिती यांच्या निर्णयानुसार शहरात लॉकडाऊन/जनता कर्फ्यू राबविण्यात येत आहे. परंतु सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू असतात. यातून संक्रमणाचा धोका लक्षात घेता शनिवारपासून दररोज अत्यावश्यक सेवा देणारे आणि ग्राहक यांच्या १०० रॅपिड तर आरटीपीसीआर अशा एकूण १५० टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजनही करण्यात आले आहे. आज १३० भाजीपाला व फळ विक्रते यांच्यापैकी ७३ विक्रेत्यांच्या रॅपिड टेस्ट केल्या. त्यात २ कोविड पॉझिटिव्ह तर ७१ निगेटिव्ह आढळून आले असून ५७ आरटीपीसीआर स्राव जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर  येथे पाठविण्यात आले आहेत.


सदर तपासणी मोहीम नगरपरिषदेचे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री कांडेकर यांच्या नियंत्रणाखाली पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी राबवत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत