कोपरगावात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

  . कोपरगाव/प्रतिनिधी शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.१४) रक्तदान शिबिर घेण्यात आले. यास तरुणांनी उस्फूर्त प्रतिस...

 

.


कोपरगाव/प्रतिनिधी


शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.१४) रक्तदान शिबिर घेण्यात आले. यास तरुणांनी उस्फूर्त प्रतिसाद देत ६७ दात्यांनी रक्तदान केले.



प्रारंभी साई कथाकार राजगुरू महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने कोरोना संकटात भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आयोजित केलेल्या रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिरास तरुणांनी उस्फूर्त प्रतिसाद देत ६७ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिरास पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख सनी वाघ यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन कौतुक केले. सदर शिबिर यशस्वीतेसाठी प्रसाद निकम, विपुल गायकवाड, विवेक गर्जे, प्रसाद सारंगधर, अल्पेश पवार, उदय घाडगे, सनी काळे, मयूर शिरसाठ, सागर गर्जे, दीपक गोर्डे, सुमित बिडवे, मुकेश ठुळे, विनोद तुपे, गणेश गायकवाड, चेतन गवळी, सोमनाथ जाधव, अभिषेक निकम, अरुण वायखिंडे, गणेश पुरोहित, रुपेश पुरोहित, मनोज आढाव, अजिंक्य लोड, समीर सारंगधर आदिंनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत