राहूरी फॅक्टरी येथील 'हे' किराणा दुकान ७ दिवस सील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथील 'हे' किराणा दुकान ७ दिवस सील

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम) कोरोना पार्श्वभूमीवर शनिवार विकऐंड लॉगडाऊन सुरू असल्याने अत्यावश्यक सर्व दुकाने बंद ठेवली जात  आहेत. इतर दिवश...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

कोरोना पार्श्वभूमीवर शनिवार विकऐंड लॉगडाऊन सुरू असल्याने अत्यावश्यक सर्व दुकाने बंद ठेवली जात  आहेत. इतर दिवशी जिल्हाधिकारी यांनी ठराविक वेळेत किराणा दुकान  चालू ठेवण्याचे आदेश दिले असताना राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील पोपट भंडारी यांच्या मालकीचे वंदना किराणा  दुकान  शनिवारी सायंकाळी मालकीचे सुरू असल्याचे निदर्शनास येताच प्रांताधिकारी डॉ.दयानंद जगताप व तहसीलदार एफ.आर.शेख यांनी सदर किराणा दुकान ७ दिवसासाठी सील करून २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे लॉगडाऊन असल्याने  अत्यावश्यक सेवा(ठराविक वेळेत) वगळता अन्य सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश  असताना  राहूरी फॅक्टरी येथील  पोपट भंडारी यांच्या मालकीचे वंदना किरणा शनिवारी सायंकाळी सुरु असताना व ग्राहकास वस्तू देताना तहसिलदार एफ.आर.शेख यांनी रंगेहाथ पकडले.


शनिवारी सायंकाळी   प्रांताधिकारी दयानंद जगताप व  राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख, महेश देशमुख , जनार्दन दौंड, शासकीय वाहनातून कोल्हारकडून राहुरीकडे जात असताना सदर किराणा दुकान  सुरू असल्याचे दिसून आले.

तहसिलदार शेख यांनी  मुख्याधिकारी अजित निकत यांना भ्रमणभाषवरुन आदेश देवून सदर किराणा दुकान  ७ दिवसासाठी सील करण्यास सांगितले. त्यानुसार नगरपालिका कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके, सुदर्शन जवक, भरत साळुंके, सोमनाथ  सूर्यवंशी, अशोक पंडीत,सखाहरी सरोदे, सुनिल कल्हापुरे आदी पथकाने  वंदना किराणा दुकान सील करण्याची प्रकिया पूर्ण करण्याची प्रकिया केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत