गावच्या लोकसंख्येनुसार प्राधान्याने लसीकरण होणार;ना.प्राजक्त तनपुरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गावच्या लोकसंख्येनुसार प्राधान्याने लसीकरण होणार;ना.प्राजक्त तनपुरे

.   . वळण/प्रतिनिधी        राहुरी तालुक्यामध्ये कोविड लसीकरणाबाबत ज्या गावांमध्ये जास्त लोकसंख्या असेल त्या गावाला प्राधान्य देऊन गावोग...

.  

.

वळण/प्रतिनिधी 


     

राहुरी तालुक्यामध्ये कोविड लसीकरणाबाबत ज्या गावांमध्ये जास्त लोकसंख्या असेल त्या गावाला प्राधान्य देऊन गावोगावाच्या मतदार यादीनुसार  लसीकरण करावे अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत.

.

          मांजरी(ता.राहुरी) आरोग्य केंद्र अंतर्गत येणा-या २० गावांच्या दक्षाता समितीच्या प्रतिनिधी समावेत नामदार प्राजक्त तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली.शनिवारी दुपारी बारा वाजता मांजरी केंद्रावर हि बैठक संपन्न झाली.बैठकीस प्रांत अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख,गट विकास अधिकारी गोविंद खामकर, वैद्यकीय अधिकारी मल्हारी कौतुके आदिंसह मांजरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या गावांमधील स्थानिक दक्षता समिचे पदाधिकारी उपस्थित होते. कोविड लसीकरणाबाबद सुसूत्रता यावी या हेतूने ना.तनपुरे यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता नागरीकाना ञास होऊ नये या हेतूने  लसीकरण करण्याच्या सुचना केल्या पहिला डोस आपल्या गावातील केंद्रावर तर दुसरा डोस मांजरी आरोग्य केंद्रावर दिला जाईल.दोन्ही डोस मधील अंतर हे ८४ दिवस असल्याने मधी कुनीही वैद्यकिय अधिकारी किंवा कर्मचारी यांना दबाव टाकु नये किंवा फोन करू नये उपलब्धेनुसार प्रतेकाला लस देण्यात येणार आहे.त्यामुळे नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत