अहमदनगर(वेबटीम) मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण व त्यानिमित्ताने सारथी संस्था चर्चेचा विषय झाला आहे. सारथी संस्थेअंतर्गत कु...
अहमदनगर(वेबटीम)
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण व त्यानिमित्ताने सारथी संस्था चर्चेचा विषय झाला आहे. सारथी संस्थेअंतर्गत कुणबी व मराठा समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून योजना राबवल्या जातात. महाराष्ट्रातील पीएच.डी व एम. फिल. संशोधक मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना सारथी संशोधन आधीछात्रवृत्ति UGC युजीसी धर्तीवर देण्यात येते.
सदरील फेलोशिप प्रथम बॅच सप्टेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रातील 502 संशोधक विद्यार्थ्यांना ही आधीछात्रवृत्ति लागू करण्यात आली.मात्र सारथी तील दिरंगाई व कुचकामी धोरणामुळे या विद्यार्थ्यांना सतत आपल्या हक्कांसाठी आंदोलन करण्याची वेळ येते.सद्या संस्थे अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप UGC प्रमाने विद्यापीठातील प्रवेश दिनांका पासून देण्यात यावी व मागील वर्षाचा थकीत घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च तत्काळ देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी दिनांक 17 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.या संबंधीचे निवेदन सारथी फेलोशिप धारकांनी सारथीला केले आहे.
कोराना च्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आपल्या घरी राहूनच संशोधक विद्यार्थी करणार आहेत. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सारथी संस्था यांच्याकडे मेल द्वारे पाठवलेले आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत झालेली नाही. सारथी संस्थेकडे खात्याचे मंत्री माननीय अजित पवार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याची भावना संशोधकांनी व्यक्त केली. संशोधन फेलोशिप 2020 च्या विद्यार्थ्यांची मुलाखत होऊन अजूनही निवड प्रक्रिया रखडलेली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तारादूत हा मराठा समाजासाठी पथदर्शी प्रकल्प बंद पडल्यानंतर त्यावरही कोणतीही कारवाई पुढे झालेली नाही. एकंदरीतच एकीकडे मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे पीचला जाणारा मराठा विद्यार्थी सारथी संस्थेत सुद्धा अडचणीत सापडला आहे. सारथी संस्थेतून मराठा समाजासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असताना राज्य सरकारच्या या धोरणामुळे मराठा समाजात अन्यायाची भावना अधिक प्रबळ होताना दिसत आहे.
सदरील मागणी त्वरीत मान्य झाल्यास संशोधनाला चालना मिळणार असुन संशोधक विद्यार्थ्यांना ही याचा लाभ मिळणार आहे. सादर मागण्या मान्य न झाल्यास टाळेबंदी उठल्यानंतर संशोधक विद्यार्थ्यांनी सारथी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत