अकोले तालुक्यात ' त्या' तीन महिन्याचे धान्य वाटपच नाही - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अकोले तालुक्यात ' त्या' तीन महिन्याचे धान्य वाटपच नाही

  अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्यात  धान्य वितरणाबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही त्या तक्रारीची   दखल घेतली जात नाही अशी खन्त व्यक्त करीत अज...

 



अकोले प्रतिनिधी-


अकोले तालुक्यात  धान्य वितरणाबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही त्या तक्रारीची   दखल घेतली जात नाही अशी खन्त व्यक्त करीत अजूनही सप्टेंबर,ऑक्टोबर व नोव्हेंबर 2020 चे धान्य गरिबांना वाटप करण्यात आलेले नाही, ते लवकरात लवकर वाटप करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे अकोले तालुका ग्राहक मंचाने केली आहे.

 

            पंतप्रधान, राज्यपाल, अन्न व पुरवठा मंत्री, जिल्हा पुरवठा अधिकारी,तहसीलदार अकोले यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

गुरूवार दि. १३ मे २०२१ रोजी राजूर येथे पोलिसांनी चार ट्रक स्वस्त धान्याच्या (गहू व तांदूळ) गाड्या पकडल्या आहे. या गाड्यामध्ये गहू व तांदुळाचे ८०० पोते (कट्टे) माल मिळून आला. हे धान्य कुठे चालले होते व ते सरकारी गोडाऊन मधून कोणाच्या आदेशाने बाहेर पडले याबाबत जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

    राजूर येथे पकडण्यात अलेल्या ५६ लाख १३ हजार ५०० रुपये किंमतीचे स्वस्त धान्य ज्या ट्रक मधून चालले होते.या  चार ट्रक चालका विरुद्ध  गुन्हा दाखल झाला असला तरी असे प्रकार अकोले तालुक्यात वारंवार होत आहेत.

               अकोले तालुका पूरवठा विभाग व संबंधीत अधिकारी यांना अशा गलथान कारभराबद्दल व गलथान धान्य वितरणाबाबतअकोले तालुक ग्राहक पंचायत वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र पुरवठा विभागाने अद्याप कोणतेही दखल घेतलेली नाही धान्य वितारणाबाबत झालेला घोळ तसेच सप्टेंबर आक्टोबर नोव्हेंबर 2020 चे मोफत धान्य अद्यापही लोकांना मिळाले नाही सदर धान्य लोकांना ताबडतोब मिळावे व आदिवासी भागातील लोकांचे धान्य ताबडतोब मिळावे अशी विनंती अकोले तालुका ग्राहक मंचाच्या वतीने करण्यात आली. या  निवेदनावर मच्छीन्द्र त्र्यंबक मंडलिक जिल्हा उपाध्यक्ष, दत्तात्रय विठ्ठल शेणकर तालुध्यक्ष,दत्तात्रय नारायण रत्नपारखी तालुका सचिव, रमेश विठोबा राक्षे जिल्हा प्रसिद्धी सचिव अहमदनगर जिल्हा यांनी सह्या केलेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत