अकोले प्रतिनिधी - जिल्हा नियोजन अंतर्गत अकोले ग्रामीण रुग्णालयात १५ जुन पर्यत १०० बेड क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु होईल.व लवकरच आदिवासी उप...
अकोले प्रतिनिधी
-
जिल्हा नियोजन अंतर्गत अकोले ग्रामीण रुग्णालयात १५ जुन पर्यत १०० बेड क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु होईल.व लवकरच आदिवासी उपयोजनेतुन तालुक्यात दुसरा ऑक्सिजन प्लॅन्ट होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
आज अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री राजेंद्र क्षिरसागर यांनी अकोले तालुक्यात येवून सुगाव कोविड सेंटर,राजुर ग्रामीण रुग्णालय व अकोले ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली.यावेळी उपविभागीय अधिकारी डॅा.शशिकांत मंगरुळे,तहसीलदार मुकेश कांबळे,जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचाैरे,गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.इंद्रजित गंभिरे, वैद्यकीय अधिक्षक डॅा.संजय घोगरे,डॅा.बाळासाहेब मेहेत्रे,डॅा.सुनिल साळुंके, राजुर ग्रा.रु.चे डॅा.दिघे,मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे आदि उपस्थित होते.
यावेळी ॲक्सिजन प्लॅन्टची पाहणी करताना ते म्हणाले कि हा प्लॅन्ट १०० ॲक्सिजन बेड क्षमतेचा आहे हा १५ जुन पर्यत कार्यान्वित होईल यातुन अकोले ग्रामीण रुग्णालयात तात्काळ ५० ॲक्सिजन बेड सुरू करुन लवकरच १०० बेड करण्यात येईल तसेच अकोले तालुक्यासाठी आदिवासी उपयोजनेतुन दुसरा ॲक्सिजन प्लॅन्ट ही मंजूर होऊन कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच सुगाव कोविड सेंटर येथील मृत्यु बाबत विचारणा करुन फारच कमी ॲक्सिजन लेवल असलेले व जे जास्त क्रीटीकल आहेत असे रुग्ण सुगाव ला ॲडमिट न करता संगमनेर अथवा नगरला पाठवण्याच्या सुचना केल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत