आ. लहामटे साहेब, तुम्ही गप्प का ? जनतेला उत्तर हवंय ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आ. लहामटे साहेब, तुम्ही गप्प का ? जनतेला उत्तर हवंय !

 अकोले :प्रतिनिधी   राजूरला धान्य पकडल्यानंतर आ डॉ किरण लहामटे हे या विषयी ब्र शब्द काढत नाहीत, त्यांचं नेमकं काय चाललय ? कोण वाचवतय या प्...

 अकोले :प्रतिनिधी


 
राजूरला धान्य पकडल्यानंतर आ डॉ किरण लहामटे हे या विषयी ब्र शब्द काढत नाहीत, त्यांचं नेमकं काय चाललय ? कोण वाचवतय या प्रकरणातील आरोपींना? का नाही ठेकेदारावर गुन्हा दाखल होत? इत्यादी प्रश्नांमधून थेट आमदार  लहामटे यांच्यावर  सरबत्ती करणारी एका युवकाची पोस्ट काल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.

  दीपक वैद्य या तरुणाने आमदार लहामटे यांना काही प्रश्न केले आहेत, वैद्य म्हणतात की,   तालुक्यातील गोरगरिबांचे रेशन धान्य तालुक्याच्या बाहेर जाताना राजूर पोलिसांची भरीव कामगिरी त्या बद्दल मी त्याचा आभारी आहे, परंतु  या तालुक्याचे आमदार किरण लहामटे या विषयावर का काही बोलत नाही, जनतेने तुम्हाला निवडून दिले कशासाठी ?तालुक्याचा धानीी कशा पद्धतीने जाते हे पाहण्यासाठी का ? चक्क दोन दिवस झाले तुमच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही का ? मी अकोले तालुक्यातील जनतेला एक विनंती करतो कि, आपण सर्वांनी 192 गावातुन माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले पाहीजे .साहेब आपण ज्या कुणाला रेशन  धान्याचा ठेक्का दिला असेल त्या माणसाचा ठेक्का त्वरित काढून घ्यावा, आ.लहामटे फोन करून अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टदारांना काय बोलतात हे पूर्णपणे जनतेला ठाऊक आहे .पण चार ट्रक धान्य राजुर पोलिसांच्या ताब्यात मिळाल्यानंतर अकोल्याचे आमदार किरण लहामटे चक्क  गप्प आहे, वाईट वाटते लहामटे साहेब, हे का बोलत नाही यांचा अर्थ काय? जनता वेडी, ना समज नाही. आमदार साहेब ,जनतेला पूर्णपणे तुम्हाला जाब विचारण्याचा अधिकार आहे, तुम्ही का बोलत नाही तुम्ही न बोलण्यामागे कोणते कारण दडले आहे हे पूर्णपणे जनतेला ठाऊक आहे, अशा कोरोना च्या काळामध्ये केंद्र सरकारने आणी राज्य सरकारने  गोरगरिबांना धान्यची मदत केली आणी ते धान्य  काळयाबाजारासाठीअकोले तालुका सोडून दुसरीकडे जाते आणि  तुम्ही म्हणतात मी जनतेचा आमदार आहे मला जनतेने निवडून दिले, शेवटी जनताच ही कर्ता-करविता असते हे तुम्ही विसरू नका, येणारा काळ ही जनता ठरवणार आहे तुम्ही जर जनतेला न्याय मिळवून देऊ शकत नाही तर अकोले तालुक्यात मोठ मोठी आंदोलन होतीं ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले त्यांना पोलिसांनी अटक केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि आमदार साहेब तुम्ही सुद्धा या गोष्टी वरती आवाज उठवला पाहिजे होता,  उठवणार नसाल तर ही जनता कदापि सहन करणार नाही, तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहात जनतेला तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुम्ही अपेक्षा भंग करू नका,आज पर्यंत तुम्ही दोन वर्षात अपेक्षा भंग केला आहे  कोणाला ठेक्का दिला त्याच्या बद्दल का बोलत नाहीत? डॉक्टर, जनतेच्या टाळूवरचे लोणी खाण्यारा ठेकेदारला कोणाचा आशिर्वाद आहे, हे जनतेला ठाऊक आहे. जर आपण हे प्रकरण दाबत असाल ताईही जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ज्या वेळेस  अकोले तालुका रस्त्यावर उतरेन त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र बघेन या तालुक्यातला प्रतिनिधीत्व करणारे आमदार काय करताय?चार ट्रक धान्य पकडले सरासरी 56 लाख रुपयांचा गोरगरिबांचा धान्य तालुक्याबाहेर चालले होते    तालुक्यातले आमदार किरण लहामटे तुम्ही करताय तरी काय? तुमचं लक्ष सध्या आहे तरी कुठे? संपूर्ण तालुक्याला आठवतंय गेल्या वर्षी तुम्ही निवडून आल्यावर तुमच्या कार्यकर्त्यांनी रेशनीग संदर्भात आवाज उठवायला सुरुवात केली,काही गावात रेशनिगच्या गाड्या अडवून रेशनीग विभागात कशी लूट चालते कमी वजनाचे धान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या माथी कसे मारले जाते हे सोशल मीडियातून तुमचे कार्यकर्ते  अगदी प्री प्लॅनिग ने मांडत होते, माल कमी आला,रेशनीग गाडीवाला  धान्य मोजून गाडी खाली करत नाही?गाडी खाली करण्याची हमाली लावली जाते ,हे तुमचे कार्यकर्ते जीव तोडून मांडत होते,गावाचे नाव आठवत नाही ब्राम्हणवाडा पट्यातील एका गावात 20 क्विंटल मालामध्ये फक्त 5 किलो माल कमी भरला त्यावर तुम्ही ठेकेदाराला घालविण्यासाठी किती धावपळ केली? सगळ्या मिडियामधून बातम्या आल्या,त्या वेळी सोशल मीडिया मधून जुना ठेकेदार घालविण्यासाठी व्यवस्थित कार्यक्रम आखला गेला .जुना ठेकेदार प्री प्लॅनिंग करून 5 किलो धान्य कमी आहे हे दाखवून घालवला गेला.आत्ता तर 50 टन माल बाहेर काळ्या बाजारात चालला होता? मागील वर्षी याच लॉक डाउन च्या काळात अकोल्यातून काळ्याबाजारासाठी  चाललेला 2 ट्रक माल कळसच्या पुढे पकडला होता?ती केस संगमनेर कोर्टात,पो स्टेशनला सुरू आहे.तेव्हाही ठेकेदार हाच होता, तेव्हाही याच ठेकेदाराला या प्रकरणातून बाहेर काढण्याच काम कोणी केलं?आत्ता यावेळी खूप मोठी अडचण झाली,हे 4 गाड्या धान्य पोलिसांनी पकडलं ,माजी आमदार वैभव पिचड यांनी पुराव्यानिशी वर पर्यंत पाठपुरावा केल्यामुळे आत्ता आपली खूप मोठी अडचण झाली?आत्ता काय?आमदार साहेब तेव्हा ठेकेदार बदलण्यासाठी आंदोलन का केली होती त्याचा जनतेला आत्ता उलगडा व्हायला सुरुवात झाली आहे ,ठेकेदार बद्दलण्यामागच राजकारण समजण्या इतकी जनता ना समज नक्कीच नाही आता आपले लक्ष ना जनतेकडे ना पुरवठा विभागाकडे !काय चाललय ? कोण वाचवतय या प्रकरणातील आरोपींना? का नाही ठेकेदारावर गुन्हा दाखल होत? याची उत्तर आपल्याला द्यावी लागतील, असेही श्री.दीपक वैद्य म्हणाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत