अहमदनगर : प्रतिनिधी पुढील तीन तासात अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, राहुरी येथील महात्मा ...
अहमदनगर : प्रतिनिधी
पुढील तीन तासात अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाणे वर्तवली आहे.मे महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे ढग गडद होताना दिसत आहे. नुकतेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
आज येणाऱ्या काही तासात म्हणजे 3 तासात जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आज सकाळपासून काही प्रमाणात वातावरणात बदल होताना दिसत असला तरी पावसाच्या या अंदाजाने शेतकरी गोंधळला आहे, कांदा उत्पादक शेतकरी कांदा झांकण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत