राहुरी: प्रतिनिधी सध्याची कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन तालुक्यातील रुग्णांची तालुक्यामध्ये उपचाराची व्यवस्था व्हावी म्हणून ...
राहुरी: प्रतिनिधी
सध्याची कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन तालुक्यातील रुग्णांची तालुक्यामध्ये उपचाराची व्यवस्था व्हावी म्हणून श्री विवेकानंद नर्सिंग होम व कै. डॉ. संजय महाडिक फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे सुमारे 50 खाटांचे अद्यावत कोव्हीड केअर सेंटर (DCHC) सुरू करण्यात आले असून या सेंटरच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा करण्याचा मानस असल्याची माहिती डॉक्टर बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांनी दिली आहे.
गेली काही दिवसांपासून कोरोना रोगाने देशात थैमान घातले आहे .त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अनेक रुग्णांना बेड मिळत नाहित त्याच बरोबर योग्य डॉक्टरांकडून उपचार मिळत नाहीत त्यामुळे देखील रुग्णांचे मृत्यू होत आहेत तालुक्यातील रुग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे या रुग्णांची व्यवस्था व्हावी म्हणून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या श्री विवेकानंद नर्सिंग होम व कै. डॉ. संजय महाडिक फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे सुमारे 50 खाटांचे अद्यावत कोव्हीड केअर सेंटर (DCHC) सुरू करण्यात आले असून यामध्ये 35 साध्या प्रकारच्या बेड असून 15 ऑक्सीजन बेडची व्यवस्था या सेंटरमध्येेेे करण्यात आलेली आहे. राहुरी येथील सुप्रसिद्ध एमबीबीएस डॉ.सुरज महाडिक व डॉक्टर विशाल आंबरे हे या कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णसेवा देणार आहेत त्याच बरोबर इतरही स्टाफ या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार असून रुग्ण जास्तीत जास्त लवकर बरा होऊन घरी कसा जाईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.
मानवतेची भावना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक रुग्णाला रुग्णसेवा देऊन त्याच्यावर उपचार केलेे जाणार आहेत या सेंटर चा तालुक्यातील रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे व्हाईस चेअरमन दत्तात्रेय ढुस विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे अध्यक्ष उदयसिंह पाटील उपाध्यक्ष श्यामराव निमसे कारखान्याचे सर्व संचालक कार्यकारी संचालक बी एन सरोदे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अंबादास पारखे साहेब विवेकानंद नर्सिंग होम चे अधीक्षक डॉक्टर बाळासाहेब पागिरे प्राचार्य डॉक्टर विलास कड यांनी केले आहे.
/div>

कोणत्याही टिप्पण्या नाहीत