शेंडीत खा. शरदचंद्र पवार कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन ; - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेंडीत खा. शरदचंद्र पवार कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन ;

 अकोले  : प्रतिनिधी। -कै.माजी आमदार यशवंतराव भांगरे प्रतिष्ठान संचलित यशवंत फाऊंडेशन च्या माध्यमातून खा. शरदचंद्र पवार कोवीड केअर सेंटरचे उद...

 अकोले  : प्रतिनिधी।


-कै.माजी आमदार यशवंतराव भांगरे प्रतिष्ठान संचलित यशवंत फाऊंडेशन च्या माध्यमातून खा. शरदचंद्र पवार कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सिताराम पाटील गायकर यांच्या हस्ते करण्यात आले

   शेंडी (भंडारदरा) येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे अमित भांगरे यांच्या संकल्पनेतून यशवंत फाऊंडेशन च्या माध्यमातून कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात आले. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे,दिलीप मंडलिक, अमित नाईकवाडी, विकास शेटे, बबन वाळुंज, सरपंच दिलीपराव भांगरे, डॉ. संतोष चोळखे, डॉ प्रमोद कोंढावळे, डॉ दिलीप बागडे, डॉ सुधीर कोटकर, डॉ बेलोशे, डॉ अमित कोंडार,डॉ सगभोर, डॉ पर्वत, ग्रामसेवक दत्तात्रय जंगाले, तलाठी अजय साळवे आदी उपस्थित होते. 

   त्यावेळी सिताराम पाटील गायकर यांनी या आदिवासी भागात कोवीड सेंटर ची गरज ओळखून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भांगरे कुटुंबीयांनी कोवीड सेंटर सुरु केले त्यासाठी  हवी ती मदत देण्याचें आश्वासन दिले. अशोकराव भांगरे यांनी  ग्रामीण आदिवासी भागातील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव व हलाखीची परीस्थिती कोवीड सेंटर सुरु केले असुन येथे रुग्नांना चहा, नाष्टा, दोन वेळेस जेवन औषधोपचार मोफत देणार असल्याचे सांगितले. तर अमित भांगरे यांनी अजुन आदिवासी भागात लसीकराबाबत उदासीनता असुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गावोगावी जाऊन प्रबोधन करणार असे सांगत कोवीड सेंटर मध्ये १५ आँक्सीजन बेड सुरु करुन सद्या ५० बेडचे असलेले कोवीड सेंटर २०० बेडचे करण्याचा मानस असुन ५ बेड फ्रंट लाईन वर्कर्स साठी आरक्षित ठेवणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक दिलीपराव भांगरे यांनी तर आभार गोपी भांगरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत