पदोन्नती संदर्भातील उच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा ; मुख्यमंत्र्यांना लिहिणारे पत्र ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पदोन्नती संदर्भातील उच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा ; मुख्यमंत्र्यांना लिहिणारे पत्र !

अकोले (प्रतिनिधी)-



अकोले (प्रतिनिधी)-


मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवरील दिलेल्या निकालाची तात्काळ अमलबजावणी करून खुल्या वर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचावर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा मराठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले खुल्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत .यासाठी राज्यातील प्रवर्गातील अधिकारी तयारीस लागले आहेत.


राज्य सरकारने २५ मे २००४ ला मागासवर्गीयांसाठी पदोन्नतीत आरक्षणाचा कायदा केला. सदर कायद्याच्या विरोधात उच्च न्यायालयात २७९७/२०१५ अन्वये  याचिका दाखल करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा बाजूने निर्णय दिला आहे व दि. २५-०५-२००४ चा कायदा रद्द केला आहे.

त्यावर सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका तत्कालीन सरकारने २८३०६/२०१७ दाखल केली व २९ डिसेंबर २०१७ रोजी सामान्य प्रशासन विभागाने पत्र काढून मागासवर्गीयांच्या ३३ टक्के पदांना सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत राखीव ठेवून अनारक्षित पदे भरण्याबाबत निर्णय घेतला.

 १८/२/२०२१ला पदोन्नतीने भरावयाची मागासवर्गीयांची ३३ टक्के पदे २५ मे.२००४ च्या सेवाजेष्ठतेनुसार खुल्या जागेतून भरण्याचा निर्णय घेतला. नंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.

दि.२०एप्रिल २०२१ ला मागासवर्गीयांची ३३ टक्के पदांना सर्वोच्च न्यायालयाच्या अंतीम निर्णय होईपर्यंत पदोन्नतीच्या कोट्यातील आरक्षित पदे रिक्त ठेऊन खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे दि.२५ मे.२००४ च्या स्थितीनुसार सेवाजेष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयाने पदोन्नती ने आरक्षण रद्द केलेले असताना ही आरक्षित पदे आली कोठून ? उच्च न्यालायचा निकाल झालेला असताना आरक्षित पदांच्या जागा या नावाखाली काही पदे रिक्त ठेवणे हा मा. उच्च न्यायालयाचा अवमान आहे.

मा.उच्च न्यायालयाच्या निकालाची सरकारला जाणीव असल्याने व मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली नसल्याने ०७ मे २०२१ ला पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील मागील चार वर्षापासुन रिक्त असलेली सर्व पदे भरली जाणार आहेत. परंतु या निर्णयामध्ये देखिल बदल करण्याची मागणी जोर धरत आहे.

वास्तवात उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शासनाने निर्गमित केलेले सर्व शासन निर्णय हे उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहेत , सदर निकलाप्रमाणे शासनाने सन २००४ पासून आतापर्यंत ज्यांना २५ मे २००४ चा कायद्याचा आधारे पदोन्नती दिली आहे त्यांना तात्काळ पदावनत करुन २५ मे २००४ चा सेवाज्येष्ठते नुसार पदनोत्तीची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्याची आवश्यकता होती, परंतु शासन वेळोवेळी असे निर्णय घेवून खुल्या वर्गावर अन्याय करीत आहे. 

आता कोविड-१९ साथीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलीस, महसूल विभाग, पुरवठा विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग इत्यादी सर्व विभाग रात्रं दिवस प्रयत्न करीत आहेत, परंतु या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण आलेला आहे याचे एक कारण म्हणजे शासनाने वेळोवेळी काही पदे रिक्त ठेवून फक्त अराखीव पदे भरण्यासाठी घेतलेले शासन निर्णय आहेत. रिक्त पदामुळे जनतेला पूर्ण क्षमतेने शासन सेवा देऊ शकत नाही व जे सेवा देत आहेत त्यांचे वर कमालीचा ताण येवून मनोधैर्य खच्ची झाले आहे, खुल्या वर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तर सतत अन्याय सहन करून निराशावादी मनोवृत्ती झालेली आहे. उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक २७९७/२०१५ मध्ये दिलेल्या निकालाची तात्काळ अमलबजावणी करण्यात यावी व असंख्य अधिकारी कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.



मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र


उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील ज्या प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही .अशा सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पदोन्नती देण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी यासाठी राज्य स्तरावरील काही कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाचे पत्र पाठवून तात्काळ भरती करण्याच्या दृष्टीने दबाव आण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत