राजूर : प्रतिनिधी अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गमआदिवासी भागातील सातेवाडी (जांभळेवाडी)गावचे सुपुत्र बाळू श्रावणा मुठे सहा. पोलीस उपनिरी...
राजूर : प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गमआदिवासी भागातील सातेवाडी (जांभळेवाडी)गावचे सुपुत्र बाळू श्रावणा मुठे सहा. पोलीस उपनिरीक्षक मुंबई यांनी त्यांच्या अतिशय हलकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी सन 2005 साली मुंबई येथे पोलीस खात्यात नोकरी मिळवली व त्यांनी त्यांच्या 15 वर्षे सेवा कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे इमानदारीने पोलीस खात्याची सेवा बजावली, त्यांना त्यांच्या सेवा कालावधीत एकूण 197 रोख बक्षिसे व 7 प्रशस्तीपत्र मिळाले आहेत, त्यांनी 15 वर्षे उल्लेखनिय सेवेबद्दल पोलीस खात्यात केलेल्या कामाची दखल घेऊन मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी त्यांना पोलीस सन्मानचिन्ह व महाराष्ट्र शासन गृह मंत्रालयाचे विशेष सेवा पदक देऊन राज्य राखीव पोलीस बलाचे पोलिस उपमहानिरीक्षक अखिलेश कुमार सिंह भापोसे मुख्यालय मुंबई यांनी 1 मे 2021 रोजी राज्य राखीव पोलीस बल मुख्यालय गोरेगाव मुंबई याठिकाणी त्यांचा गौरव करण्यात आला .
सदर कार्यक्रमा ठिकाणी एसीपी लोखंडे कांबळे पी एस आय टोकरे पटले व पोलीस खात्यातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे पोलीस मित्र उपस्थितीत होते . त्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल त्यांचे सातेवाडी गावचे नाव नक्की उंचीवर गेले आहे व याबाबत त्यांचे आईवडील आणि सर्व परिवार तसेच त्यांचा सर्व मित्र परिवार यांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे त्यांनी यापुढे ही अशीच पोलीस खात्यात त्यांचे हातून चांगली कामगिरी घडो ही अपेक्षा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत