कोपरगावात ऑक्सिजन प्लांट लवकरच होणार सुरू- नगराध्यक्ष वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात ऑक्सिजन प्लांट लवकरच होणार सुरू- नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव प्रतिनिधी  कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढल्याने रुग्णासंख्या वाढून मृत्युचे प्रमाणही वाढतच आहे. सर्वत्र हाहाकार उडालेल...

कोपरगाव प्रतिनिधी

 कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढल्याने रुग्णासंख्या वाढून मृत्युचे प्रमाणही वाढतच आहे. सर्वत्र हाहाकार उडालेला दिसतो आहे. इंजेक्शन व ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही हॉस्पिटल बंदच करावे लागतील अशी परिस्थिती आहे. कोपरगावमध्ये "ऑक्सिजन प्लान्ट" उभारून काही प्रमाणात तरीऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत कोपरगाव चे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव येथे आयोजित विचारविनिमय बैठकीत व्यक्त केले.

या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी  नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एक प्राथमिक सहविचार सभा आयोजित केली होती. यावेळी  श्री.काका कोयटे, राजेशजी परजणे, नितीनराव औताडे, अरविंदजी भन्साळी, राजेशजी ठोळे, डॉ.महेंद्र गोंधळी, डॉ.योगेश कोठारी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, डॉ. कृष्णा फुलसुंदर,विजयजी बडजाते, अजिंक्य भन्साळी, राजकुमार बंब, सुधीर डागा, रिकबशेठ शिंगी आदी  उपस्थित होते. 

यावेळी सर्वांगिण विचारविनिमय होऊन लवकरात लवकर कोपरगावात  ऑक्सिजन प्लान्ट उभा करण्यावर एकमत झाले. याविषयावर पुन्हा बसून  अंतिम रूप दिले जाणार आहे असे विजय वहाडणे यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत