गगन हाडा यांच्या पाठपुराव्यातून कोर्ट रस्त्याचे काम सुरु - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गगन हाडा यांच्या पाठपुराव्यातून कोर्ट रस्त्याचे काम सुरु

  कोपरगाव/प्रतिनिधी येथील  शिवसेनेचे उपशहरप्रमुख गगन हाडा यांनी पालिकेला निवेदन देऊन कोर्ट रस्त्याचे काम करण्याची मागणी केली होती. अखेर पालि...

 कोपरगाव/प्रतिनिधी

येथील  शिवसेनेचे उपशहरप्रमुख गगन हाडा यांनी पालिकेला निवेदन देऊन कोर्ट रस्त्याचे काम करण्याची मागणी केली होती. अखेर पालिकेने याची दखल घेऊन रविवारी (ता.२) कामास सुरुवात केल्याने शहरवासियांतून समाधान व्यक्त होत आहे.

 

कोपरगाव शहरातील कोर्ट रस्ता हा अतिशय रहदारीचा असल्याने त्याचे लवकरात लवकर काम होणे गरजेचे होते. याबाबत शिवसेनेचे उपशहरप्रमुख गगन हाडा यांनी पालिकेला निवेदन देऊन काम करण्याची मागणी केली होती. याची पालिकेने दखल घेऊन रविवारी कामास सुरुवात केली आहे. याबद्दल नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकरी प्रशांत सरोदे, पालिकेचे अधिकारी आणि हाडा यांचे शहरवासियांतून आभार व्यक्त होत असून, सदर रस्त्याचे डांबरीकरण दर्जेदार करण्याचीही अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत