तुकाराम सहाणे यांना पत्नीशोक अकोले : प्रतिनिधी अकोले - देवठाण -हिवरगाव आंबरे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम विठोबा सहाणे यांच्या पत्नी व दैन...
तुकाराम सहाणे यांना पत्नीशोक
अकोले : प्रतिनिधी
अकोले - देवठाण -हिवरगाव आंबरे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम विठोबा सहाणे यांच्या पत्नी व दैनिक युवावार्ता च्या संपादिका सौ.सुशीला हासे यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मीबाई तुकाराम सहाणे यांचे सोमवार दि. 24 मे 2021 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय 78 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. लक्ष्मीबाई या अतिशय धार्मिक स्वभावाच्या होत्या. जातीवरच्या ओव्या आणि बहिणाबाईंची गाणी म्हणण्यात त्यांना विशेष रुची होती. आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारचे फळझाडे त्यांनी लावली आणि वाढविली. मुला-मुलींना संस्कारित करून त्यांच्या आयुष्याची चांगली घडी त्यांनी बसवली.
त्यांच्या आकस्मित निधनाने सहाणे परिवार व नातेवाईकांना अतीव दुःख झाले आहे. कोरोना साथीचे नियम पाळून त्यांच्यावर हिवरगाव आंबरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्या युवावार्ता या वृत्तपत्राचे संस्थापक किसन भाऊ हासे यांच्या सासू होत्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत