भाऊसाहेब गायकर यांची अपर पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भाऊसाहेब गायकर यांची अपर पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती

  अकोले : प्रतिनिधी    पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर गृहविभागाला मुहूर्त मिळाला असून अकोले तालुक्यातील कळंब गा...

 

अकोले : प्रतिनिधी   



पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर गृहविभागाला मुहूर्त मिळाला असून अकोले तालुक्यातील कळंब गावचे सुपुत्र व येथील सह्याद्री विद्यालयाचे माजी विद्यार्थी,वरीष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गायकर यांची महराष्ट्रातील राज्य गुप्तवार्ता विभागात अपर पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. 

           भाऊसाहेब गायकर यांची ३३ वर्षे निष्कलंक सेवा झाली आहे.सेवकाळात त्यांनी अनेक बक्षिसे पटकावली आहेत.त्यांचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे.वडील कळंब गावातच सालकरी म्हणून दोनशे पंचाहतर,पाचशे व नऊशे रुपयांनी कामाला होते.आईने मागे हटायचे नाही म्हणून बजावले होते.जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून त्यांनी आई-वडिलांचे स्वप्न साकार केले.


            गायकर यांचे प्राथमिक शिक्षण कळंब येथे झाले.पाचवी ते दहावी पर्यंतचे  शिक्षण ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालयात झाले तर  अकरावी ते बीकॉम पर्यंतचे शिक्षण अकोले कॉलेज येथे झाले.पदवीनंतर कळंब गावातील तत्कालीन सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मारुतराव लांडगे हे त्यांना पुण्याला शिक्षणासाठी घेऊन गेले.त्यांचे पदव्युत्तर शिक्षण गरवारे कॉलेज पुणे येथे झाले.तेथील अप्पासाहेब जेधे कॉलेजचे प्राचार्य कॅप्टन कोल्हटकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन केले.कळंबचे रंगनाथ लांडगे यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था केली. पाटबंधारे सचिव रोमा तथा बाळासाहेब लांडगे यांनी स्पर्धा  परीक्षेसाठी मार्गदर्शन केले.त्यावेळी ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुणे केंद्रातून तिसरे आले होते.पुढे पिटीसी नाशिक येथे ट्रेनिंग करून मुंबईला अंधेरी, शिवाजीपार्क,मालवणी,

समतानगर पोलीस ठाणे येथे नोकरी केली.एसपीयू विशेष सुरक्षा विभाग येथे नोकरी करताना बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार अमिताभ बच्चन,गानसम्राज्ञी लता मंगेशकर,मोरारजी देसाई, छगन भुजबळ यांचे अंगरक्षक म्हणून काम केले.  पुढे पोलिस निरीक्षक म्हणून नागपूर येथे नंदनवन, कोराडी पोलीस ठाण्यास काम केले.नागपूरला पंचवीस खुनांचे गुन्हे, तसेच इतर गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला.अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले. एकूण सात जणांना जन्मठेपेची शिक्षा.वीस गुंडांना तडीपार केले. 

        तसेच सायबरसेल नवी मुंबई येथे प्रभारी असताना चाळीस लाख रुपये तक्रारदारांचे मिळवून दिले.एका बनावट कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला व पन्नासचे वर गुन्हेगारांना अटक केली.त्यांनी नोकरीच्या कालखंडात दोनशेच्या वर बक्षीसे व रोख तीस हजार रुपये बक्षीस पटकावले आहे.गायकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत