दे.प्रवरा (राजेंद्र उंडे) :- कोरोना संक्रमणातील 250 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करणारे डाँ.विक्रम खुरुद यांना "माणसातील देवमाणूस...
कोरोना संक्रमणातील 250 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करणारे डाँ.विक्रम खुरुद यांना "माणसातील देवमाणूस" म्हणून राहुरी तालुका परीसरात ओळखले जाते.खुरुद हाँस्पीटलमध्ये तरुणापासुन ते वृद्धांपर्यंत यशस्वी उपचार करुन रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.अनेक रुग्णांनी डाँ.खुरुद हे "माणसातील देव" आहे अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. राहूरी शहरातील डॉ. विक्रम खुरुद यांच्या कोविड हॉस्पिटल व शिवबा प्रतिष्ठाणच्या कोविड सेंटर मधुन अनेक कोरोना रुग्णांना डाँ.खुरुद यांचे उपचार वरदान ठरले असुन रूग्ण बरे होऊन घरी आनंदाने परत असल्याने अनेक रुग्णांच्या कुटुंबियांनी डाँ.खुरुद "माणसातील देव" असल्याचे सांगुन त्यांच्या उपचारावर समाधान व्यक्त केले आहे. राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना रुग्णांवर योग्य व माफक दरात उपचार व्हावे यासाठी राहूरी शहरात डॉ.विक्रम खुरुद यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्याच बरोबर राहुरी फँक्टरी येथे शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर त्यांच्या आधिपत्याखाली सुरु केले.कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना त्यांना डॉ.रवी घुगरकर व सहकारी यांनी मोलाची साथ लाभली. खुरुद हॉस्पिटलमध्ये आज पर्यंत 250 पेक्ष्या जास्त कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले रुग्ण ठणठणीत बरे होवून पुर्वी प्रमाणे रुग्ण घरी आल्याचे समाधान व्यक्त होत आहे.डाँ.खुरुद हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे डॉ. खुरुद यांच्या बद्दल प्रतिक्रीया देताना त्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, डॉ.विक्रम खुरुद हे कोरोना रुग्णांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. त्यांनी केलेल्या योग्य आणि तातडीच्या उपचारामुळेच माझे नातेवाईक लवकर बरे झाले आहे. या हाँस्पीटल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची लुट केली जात नाही. अव्वाच्या सव्वा बिलाची अकारणी सुद्धा केली गेली नाही.विशेष म्हणजे रेमडीसीवर इंजेक्शनचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात चालू असताना डाँ. खुरुद हॉस्पिटलने योग्य किमतीत उपलब्ध करून दिले. रेमडीसीवर इंजेक्शन आणण्यासाठी रुग्णाच्या कोणत्याही नातेवाईकाला कुठेही धावपळ करावी लागली नाही. डाँ.खुरुद यांच्या बद्दल चार शब्द लिहताना माझ्या मनाचा एकही शब्द या लेखात वापरला नाही.रुग्णाच्या व नातेवाईकांच्या बोलक्या प्रतिक्रीयातुन हा लेख तयार केला आहे. डॉ. खुरुद हे कोविड आजारातील मानक कार्यपद्धतीचा ( SOP ) चा अवलंब करून आजाराच्या सद्य स्थितीचं योग्य विश्लेषण करून रुग्णावर योग्य ते उपचार करत आहे. रुग्णावर उपचार करत असताना डॉक्टरांकडून जो काही निर्णय घेतला जातो तो प्रत्येक निर्णय डॉक्टर खुरुद यांच्या निर्णय क्षमतेची, बुद्धिमत्तेची आणि प्रदीर्घ अनुभवाची प्रचिती देतो असे नातेवाईकांच्या लक्षात आले आहे. एका आधिकाऱ्याच्या बोलण्यात कायम आज माझा लहान बंधु जिवंत आहे. तो फक्त डाँ.खुरुद यांच्या निर्णय क्षमतेमुळेच सहज माझ्या बंधुचे सर्व रिपोर्ट डाँ.खुरुद यांना दाखवले त्यांनी अभ्यासपुर्वक अवलोकन करुन तुमच्या बंधुला आता कोणतीही वेळ न दडवता नगर येथे उपचारासाठी दाखल करा. दोन ते तीन तासात या रुग्णाची आँक्सीजन लेवल कमी होणार आहे. या रुग्णास व्हेंटीलेटरची गरज पडणार आहे. असा निर्णय त्यांनी सांगितला.
डाँ.खुरुद यांना रिपोर्ट दाखवण्यापुर्वी एका डाँ. कडे रिपोर्ट व रुग्णाची तपासणी करण्यात आली त्यांनी काहीच होणार नाही, पाच दिवसाच्या गोळ्या घ्या असे सांगितले डॉ.खुरुद यांच्या सल्ल्या नुसार बंधुस नगर येथे हलवले.अवघ्या तीन तासात रुग्ण सिरीयस झाला. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आज माझा बंधु आमच्या बरोबर आनंदात आहे.डाँ.खुरुद यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.
कोरोना काळात डॉक्टर मंडळींनी अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करुन रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लुट केली आहे. माञ त्यास डाँ.खुरुद हे अपवाद आहे.त्यांनी माफक बिलाची आकारणी केल्याने आज पर्यंत उपचार घेतलेल्या रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी त्यांची आर्थिक लुट केली आसा चकार शब्दही काढला नाही.उलट रुग्णांसाठी डाँ.खुरुद देव माणूस आहे.या देव माणसाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा !
राजेंद्र उंडे
प्रतिनिधी
9890233714
9518553242


कोणत्याही टिप्पण्या नाहीत