कोपरगावमध्ये १५ मे पर्यंत जनता संचारबंदीत वाढ : वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावमध्ये १५ मे पर्यंत जनता संचारबंदीत वाढ : वहाडणे

  कोपरगाव : प्रतिनिधी दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार (ता.८) पर्यंत लागू केलेल्या संचारबंदीत रविवारपास...

 

कोपरगाव : प्रतिनिधी



दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार (ता.८) पर्यंत लागू केलेल्या संचारबंदीत रविवारपासून (ता.९) शनिवापर्यंत (ता.१५) वाढ करण्यात आली आहे. तसेच शनिवार व रविवारीही अत्यावश्यक सेवांबरोबर भाजीपाला-फळे विक्री सुरू राहणार असल्याचे कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी स्पष्ट केले आहे.



या नवीन निर्णयाबाबत जनतेला संबोधित करताना नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, शनिवारी (ता.८) संपणारी जनता संचारबंदीत रविवार (ता.९) दुपारी ३ वाजेपासून शनिवार (ता.१५) पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच शनिवार व रविवारी देखील अत्यावश्यक सेवेबरोबर भाजीपाला-फळे विक्री बाजारतळावरील ओट्यांवर सुरू राहणार आहे. याचे व्यवस्थित नियोजन व्हावे, रस्त्यात अडथळा होऊ नये, बेसुमार गर्दी होऊन कोरोना प्रादुर्भाव वाढू नये; यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करणे करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.  यासाठी शनिवारी व रविवारी सकाळी ७ वाजता आपण इंदिरा शॉपिंग सेंटरजवळ एकत्र जमावे असे सूचित केले आहे. 

त्याचप्रमाणे जनता संचारबंदी यशस्वी करण्यासाठी आपापल्या प्रभागात कुणीही रस्त्यावर येऊ नये, संचारबंदीचे नियम पाळावेत यासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे. तसे केले तरच कोरोनाचा प्रभाव कमी करता येणार असल्याचे शेवटी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत