आरडगांवात शांततेत लसीकरण ; ७० व्यक्तींनी घेतला लाभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरडगांवात शांततेत लसीकरण ; ७० व्यक्तींनी घेतला लाभ

  आरडगांव : वार्ताहर       राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे कोरोना व्हॅक्सीन लसीकरण प्रक्रिया शांततेत पार पडली असून ७० व्यक्तींना लसीकरण ...

 

आरडगांव : वार्ताहर


     

राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे कोरोना व्हॅक्सीन लसीकरण प्रक्रिया शांततेत पार पडली असून ७० व्यक्तींना लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

आरडगांव येथे सकाळी ११ वाजल्यापासून पथदर्शी लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत एकूण ७० लसीकरण डोस उपलब्ध झाले होते. आधार नोंदणी करून याच ऑनलाइन प्रक्रिया पुर्ण करून प्रत्येक व्यक्तीला टोकन दिल्यानंतर पुढील लसीकरणासाठी आरोग्य उपकेंद्रात पाठविण्यात आले या   सामाजिक अंतर ठेवत अतिशय योग्य पद्धतीने नियोजन करत  शांततेत लसीकरण पार पडले. नागरीकांनी नियमांचे पालन करत या ७० पैकी पहिला डोस फ्रंट लाईन वर्कर्स शिक्षक ८ , अपंग १ डोस ग्रामपंचायत कर्मचारी ५ ,इतर १० पैकी दुसरा डोस ४६ या पध्दतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.

 या प्रसंगी ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुनील मोरे साहदु झुगे नानासाहेब म्हसे यांच्या सह आरोग्य सेविका डॉ एन.ई.वाबळे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ पाराजी धोत्रे, डॉ. जे आर कसबे,डॉ एस.एसपोंदे डॉ ऐ.के.शेजवळ,आशा सेविका मनिषा म्हसे,शितल म्हसे,शिला तारडे,मदतनीस सिंधु भुसारे कामगार तलाठी रविंद्र बाचकर ,ग्रामविकास अधिकारी के.सी. भिगारदे, पोलिस पाटील लक्षण जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी संदिप जेऊघाले दत्तात्रय म्हसे आदिंनी विशेष परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत