राहुरी कृषी विद्यापीठ येथील कुलसचिव मोहन वाघ निलंबित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी कृषी विद्यापीठ येथील कुलसचिव मोहन वाघ निलंबित

राहूरी(वेबटीम)  महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलसचिव मोहन रामभाऊ वाघ यांचे निलंबन करण्यात आलेे आहे. तसे पत्र विद्यापीठ प्रशासन...

राहूरी(वेबटीम)

 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलसचिव मोहन रामभाऊ वाघ यांचे निलंबन करण्यात आलेे आहे. तसे पत्र विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले. निलंबनाच्या कारवाईबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत. कुलसचिव पदाचा कारभार महानंद माने यांच्याकडे दिला आहे. 


 याबत माहिती देताना दादासाहेब पवार यांनी म्हंटले की,  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत  कुलसचिव मोहन वाघ त्याचे पुर्ण सेवा काळात वादग्रस्त राहिला आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव पदावर वाघ यांची नियुक्ती झाली होती.सदर नियुक्तीस सामाजिक कार्यकर्ते मी शासनस्तरावर तक्रार केली तसेच अवैध निवड प्रक्रिया बाबत pil/७४४३/२०२१ औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या अनुशंगाने मा. राज्यपाल यांनी मुख्य सचिव (कृषी) यांना तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिले होते. या तक्रार अर्जात अनेक आरोप आहेत, त्यात वाघ हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे रुजू झाल्यानंतर अनेक कर्मचारी यांना जाणीवपूर्वक त्रास दिला.अधिष्ठाता, संशोधन संचालक व कुलगुरू यांना  चुकीचे पध्दतीने सांगुन बदल्या केल्या कर्मचारी यांचे पगार थांबविल्याचे बोलले जाते.


 कुलगुरूची मान्यता न घेता फाईल व परिपञक बनविले.अधिष्ठाता, संशोधन संचालक ,कुलगुरू व मंत्री महोदय यांनी दिलेल्या सुचना कडे दुर्लक्ष केले.कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील साहेब यांनी मोहन वाघ यांना निलंबित  केल्याने त्यांच्या जागेवर माने यांनी कार्यभार स्विकारला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत