नवीन ईदगाह मैदानाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी द्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नवीन ईदगाह मैदानाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी द्या

कोपरगाव/प्रतिनिधी शहरातील जुन्या ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी जागा कमी पडत होती. त्यामुळे गट क्रमांक १०५  मध्ये नवीन ईदगाह मैदान करण्यात आले...

कोपरगाव/प्रतिनिधी

शहरातील जुन्या ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी जागा कमी पडत होती. त्यामुळे गट क्रमांक १०५  मध्ये नवीन ईदगाह मैदान करण्यात आले. परंतु, संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. यासाठी ईदगाह मैदानाभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी आणि सुशोभीकरण करण्यासाठी आमदारांनी एक कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी म्हंटले आहे की, जुन्या ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यामुळे शहरातील गट क्रमांक १०५ मध्ये नवीन ईदगाह मैदान तयार करण्यात आले.


 परंतु येथे मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने मैदानाचे पावित्र्य राखले जात नाही. त्यासाठी मैदानाभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी आणि सुशोभीकरण करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी एक कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत