कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील १६ वर्षीय मुलगी प्रियंका दत्तात्रय गायकवाड ५ मे रोजी बुधवारी सकाळी 6 वाजता घरी कोणालाही...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील १६ वर्षीय मुलगी प्रियंका दत्तात्रय गायकवाड ५ मे रोजी बुधवारी सकाळी 6 वाजता घरी कोणालाही न सांगता घरातील सावत्र आईच्या दररोजच्या वादाला कंटाळून चांडगाव ता.वैजापूर जी.औरंगाबाद येथील काकाच्या घरी निघून गेली होती.
प्रियंकाचे वडील दत्तात्रय संपत गायकवाड यांना मुलगी घरात नसल्याचे कळल्याने त्यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मुलीचे अपहरण झाल्याची कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 141/ 2021 भा द वि कलम 363 अंतर्गत तक्रार दाखल केली.पोलिसांनी अखेर शोध सुरू केला असता ती चांडगाव ता.वैजापूर येथील काकाच्या घरी सुखरूप असल्याची माहिती कळाल्याने आज ६/५/२०२१ गुरुवार रोजी प्रियंका हिला काकाच्या काकांच्या ताब्यातून घेवुन वडील
दत्तात्रय संपत गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आबासाहेब वाखुरे करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत