वळण येथे शांततेत लसीकरण, शंभर व्यक्तींनी घेतला लाभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळण येथे शांततेत लसीकरण, शंभर व्यक्तींनी घेतला लाभ

राहुरी/प्रतिनिधी        राहुरी तालुक्यातील वळण येथे कोरोना व्हॅक्सीन लसीकरण प्रक्रिया शांततेत पार पडली असून १०० व्यक्तींना लसीकरण पूर्ण करण्...

राहुरी/प्रतिनिधी 

      राहुरी तालुक्यातील वळण येथे कोरोना व्हॅक्सीन लसीकरण प्रक्रिया शांततेत पार पडली असून १०० व्यक्तींना लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळपासून ग्रामपंचायत प्रांगणामध्ये गावातील १०० व्यक्तींची नोंदणी करून याच ठिकाणी ऑनलाइन प्रक्रिया पुर्ण करून प्रतेक व्यक्तीला टोकन दिल्यानंतर पुढील लसीकरणासाठी आरोग्य उपकेंद्रात पाठविण्यात आले या ठिकाणी २५-२५ व्यक्तीचे ग्रुप करत सामाजिक अंतर ठेवत अतिशय योग्य पद्धतीने व शांततेत हे लसीकरण पार पडले. नागरीकांनी नियमांचे पालन करत या प्रक्रियेस उत्तम प्रतिसाद दिला.


 याकामी आरोग्य सेविका एस.जी.लोखंडे,ऐ.के.शेजवळ,महेश आढाव,आशा सेविका ठाकर एम. वाय.,सरपंच सुरेश मकासरे, तलाठी रविंद्र बाचकर ,ग्रामसेवक संतोष राठोड, पोलिस पाटील सोमनाथ डमाळे, अदिनाथ कार्ले,अंगणवाडी सेविका अंजना आढाव,सुनंदा खुळे,सरस्वती दरंदले,अशोक कुलट,फकिरचंद फुणगे, राजु कार्ले आदिंनी विशेष परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत