देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ढुस यांनी आपले चिरंजीव स्व. अक्षय ढुस यांच्या स्मर...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ढुस यांनी आपले चिरंजीव स्व. अक्षय ढुस यांच्या स्मरणार्थ ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री. साई प्रतिष्ठानला प्रदान केली आहे.
सध्या कोरोना महामारीमुळे थैमान घेतले असून अनेक वेळा कोरोना रूग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याने उपचारास्थळी जाण्यास अडचण निर्माण होत आहे. हीच गरज ओळखून देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रवींद्र ढुस यांनी आज आपले चिरंजीव स्व.अक्षय ढुस यांच्या स्मरणार्थ ऑक्सिजन रूग्णवाहिका श्री. साई प्रतिष्ठानला महंत उद्धव महाराज मंडलिक(नेवासेकर) यांच्या हस्ते प्रदान केली.
यावेळी रवींद्र ढुस, अनंत कदम, बाळासाहेब ढुस, दत्तात्रय ढुस , नगरसेवक सचिन ढुस, आप्पासाहेब ढुस बाबा महाराज मोरे किशोर महाराज शेळके व ढुस डॉ.संदीप मुसमाडे, जयेश मुसमाडे, मच्छीन्द्र कराळे, बाबासाहेब मुसमाडे, दिनेश जोशी, किरण लासुरकर, रावसाहेब मुसमाडे, आबासाहेब कदम, रंगनाथ मुसमाडे, विकास टेकाळे, डॉ.कोमल ढुस आदींसह ढुस कुटुंबीय उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत