कारेगाव-खोकर निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करा-नितीन पटारे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कारेगाव-खोकर निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करा-नितीन पटारे

 श्रीरामपूर(वेबटीम) लॉकडाऊन असल्याने कोणीही लक्ष द्यायला येत नसल्याने तालुक्यातील कारेगाव-खोकर-भेर्डापूर दुरुस्तीच्या कामाच्या अंदाजप...

 श्रीरामपूर(वेबटीम)

लॉकडाऊन असल्याने कोणीही लक्ष द्यायला येत नसल्याने तालुक्यातील कारेगाव-खोकर-भेर्डापूर दुरुस्तीच्या कामाच्या अंदाजपत्रकात खाडाखोड करून सर्रास कच्ची खडी वापरून निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. ठेकेदारावर कोणाचाही वचक राहिला नसून अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा सर्व कारभार सुरू असल्याचा आरोप अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पटारे यांनी म्हटले आहे की, सध्या सर्वत्र कडक लॉकडाऊन पाळला जात आहे. मात्र तालुक्यातील कारेगाव-खोकर-भेर्डापूर रस्ता दुरूस्तीचे काम जोरात सुरू आहे. सदर काम 800 मीटरअंतरावर सुरूअसून त्यात सर्रासपणे कच्ची खडी वापरून सुट्टी च्या दिवशी शनिवार रविवार हे काम केले जात आहे. चे दत्तात्रय कुलकर्णी हे अधिकारी या कामावर हजर असतात. त्यांच्या देखरखी खाली चालणाऱ्या या निकृष्ट कामाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता कुणाकडे तक्रार करायची करा आम्ही काम सुरूच ठेवणार काम बंद पाडले तर शासकीय कामात अडथळा निर्माण होईल असे उत्तर देतात. आज दि 9 मे रोजी कामावर 25 ते 30 मजूर आले असता लॉकडाऊन असताना आज इतके मजूर एकाच रिक्षातून नेवासा तालुक्यातून कारेगावत कामावर आले असता कुलकर्णी साहेब यांना विचारणा केली असता आम्ही सर्व परवानग्या घेवून काम करतोय तुम्ही तहसीलदार कडे जा नाहीतर जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार करा असे उद्धट उत्तर दिले. 


त्यानंतर छावा चे जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्कसाधला असता मी माझेकडून कोणीहीपरवानगी काढली नाहीअसे सांगितले त्यानंतर तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे याना फोन केला असता मीचौकशी करतो असे म्हणाले कोणीही पोलीस कर्मचारी इकडे फिरकले नाही तसेच गावातील ग्रामसेवक भालदंड भाऊसाहेब यांना विचारणा केली असताविकास कामाना परवानगी आहे पण जनता करफु काळात आहे की नाही माहीत नाही  कोरोनाचे थैमान असताना कांदा भरणारे मजूर शहरातून रिक्षातून खेड्याकडे पोलीस येऊ देतनाही फक्त ठेकेदाराने मजुरांच्या रिक्षा कशा सोडतात त्याही जनता करफु काळात हे मोठं गौडबंगाल आहे याची चौकशीकरण्या साठी तसेच निकृष्ठ दर्जाचे कामाची वेळोवेळी तक्रार करून दखल न घेणाऱ्या दत्तात्रय कृलकर्णी याअधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी कार्यकारीअभियंता, पाटील संगमनेर यांच्याकडे केली असल्याचे पटारे यांनी पत्रकात म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत