30 जूनपर्यंत सर्व बदल्या थांबवल्या ; शासन निर्णय ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

30 जूनपर्यंत सर्व बदल्या थांबवल्या ; शासन निर्णय !

 मुंबई : वेबटीम    राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात, तथापि, ...

 मुंबई : वेबटीम 


 
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात, तथापि, कोव्हीडीमुळे गेल्या वर्षीही 10 ऑगस्ट पर्यंत बदल्या थांबविण्यात आल्या होत्या, मात्र, आता ते आर्थिक वर्ष संपून 2021-22 हे नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे या वर्षी बदल्या करण्याबाबत शासनाने धोरण जाहीर करताना कोव्हिडं परिस्थिती लक्षात घेता 30 जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करू नयेत, असे आदेश जारी केले आहेत.त्यामुळे बदलीसाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही दिवस प्रतिक्षाच करावी लागणार आहे. 

         सद्यस्थितीत राज्यात कोव्हिडं संसर्गजन्य रोगाचा वाढत पादृभाव विचारात घेता सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षी दि 30 जून 2021 पर्यंत बदली अधिनियमानुसार कोणत्याही बदल्या सर्वसाधारण बदल्या तसेच काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे करावयाच्या बदल्या करणेत येऊ नयेत, असे या शासन निर्णयांनव्ये  सूचित करण्यात येत आहे. तथापि उपरोक्त नमूद कालावधीत केवळ सेवनिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणे, कोरोना रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक असल्याची खात्री पटल्यास बदली करावी, असे आदेश गीता कुलकर्णी (उपसचिव महाराष्ट्र शासन) यांनी बजावले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत