लोकप्रतिनिधीनी कोरोनाविरुद्ध संघर्षात रस्त्यावर उतरावे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लोकप्रतिनिधीनी कोरोनाविरुद्ध संघर्षात रस्त्यावर उतरावे

कोपरगाव प्रतिनिधी कोरोनाविरुद्ध संघर्षात रस्त्यावर उतरण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढे यावे असे आवाहन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केल...

कोपरगाव प्रतिनिधी

कोरोनाविरुद्ध संघर्षात रस्त्यावर उतरण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढे यावे असे आवाहन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.

 नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले की, कोपरगाव शहर व तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासन व नागरीक एकजुटीने प्रयत्न करत असूनही समाधानकारक यश मिळत नाही. कारण कोरोनाची टेस्ट पोझीटीव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये दाखल न होता अनेकजण आपापल्या घरीच विलगीकरणात राहातो असे सांगून कोविड सेंटरला जायची टाळाटाळ करत आहेत. काहीजण तर कोरोना पोसीटीव्ह असूनही खुशाल रस्त्यावर फिरतांना दिसतात. काहीजण रिपोर्ट येईपर्यंतही घरात थांबत नाहीत. घरच्यांनाही न जुमानता शहरात फिरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविणारे सर्वांनाच घातक ठरत आहेत. प्रशासनालाही काही मर्यादा आहेत. मनुष्यबळही कमीच आहे. नगरपरिषद, पोलीस व महसूल विभाग आणि आरोग्य यंत्रणेतील काहीजणही कोरोनाग्रस्त झालेले आहेत.


  अशावेळी सर्व आजी माजी नगरसेवक , लोकप्रतिनिधी समाजसेवकांनी दररोज किमान दोन तास तरी आपापल्या प्रभागात-विभागात फिरून कुणाच्याही घरात न जाता, सुरक्षित अंतर ठेवून चौकशी व आरोग्यासाठी सूचना करणे गरजेचे आहे. एखाद्या घरात कोरोना रुग्ण असूनही कोविड सेन्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जात नसेल तर त्वरित तशी माहिती शासकिय यंत्रणेला दिली पाहिजे. तरच रुग्णसंख्या कमी होऊ शकते. असे न केल्यास कितीही दिवस लॉकडाऊन केले तरी चांगले परिणाम मिळणार असे मत नगराध्यक्ष वहाडणे यांनी व्यक्त केले आहे.

 पुढे बोलताना वहाडणे म्हणाले मी सर्व व्यवहार सुरळीत करायचे असतील तर आपल्या सर्वांना कोरोनाविरुद्धच्या संघर्षात प्रत्यक्ष भाग घ्यावा लागणार आहे. नुकतेच नगरसेविका सपना मोरे यांचे पती भरत मोरे यांनी आपल्या प्रभागात फिरून नाविन्यपूर्ण पद्धतीने जनजागृती करून चांगले पाऊल उचलले आहे. सर्वांनी नियम पाळून जनसंपर्क वाढवून जनतेला कोरोना विरुद्ध जागृत केले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत