नेवासा :प्रतिनििधी नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच सतिश निपुंगे य...
नेवासा :प्रतिनििधी
नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच सतिश निपुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुन्हा (दुस-यांदा) व्यापारी व ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली.
मुकिंदपूर परिसरात सध्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला. यावेळी रुग्णांच्या घशातील स्राव घेऊन कोरोना चाचणी करण्यात आली. मुकिंदपूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही चाचणी केली. एकूण ३८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. या संदर्भात कालच सरपंच सतीश निपुंगे यांनी सोशल मिडीयाद्वारे सर्व व्यापारी व ग्रामस्थांना या कोरोना चाचणी शिबिरासंदर्भात माहिती देऊन या शिबिरात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्याप्रमाणे आज नागरिकांनी सरपंच सतीश निपुंगे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत कोरोना चाचणी करून घेतली.
या शिबिराच्या माध्यमातून मुकिंदपूर परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्यास मदत होईल असा आशावाद यावेळी सतिश निपुंगे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सरपंच सतिश निपुंगे, ग्रामसेवक गणेश दुधाळे, कोरोना कमिटी सदस्य प्रताप हांडे, गणेश माटे, निलेश निपुंगे, भैय्या डावकर, ज्ञानेश्वर माटे, वेणुनाथ ठाकर, संदीप लहिरे, नवनाथ इटकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विशाल तिवारी, कानिफनाथ उपळकर यांसह आरोग्य विभागाचे औदुंबर कणसे, शिवाजी जवणे, अनिता मरकड, नलिनी जपे, रेखा साळवे, ज्योती शेंडे, उमा गायकवाड आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत