आम्हाला गोळ्या घालून मारा ; तनपुरेंसमोरचं भिटे-पटारेंमध्ये जुंपली ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आम्हाला गोळ्या घालून मारा ; तनपुरेंसमोरचं भिटे-पटारेंमध्ये जुंपली !

राहुरी : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून वांबोरीचे राजकारण चांगलेच पेटलेले आहे. आजही माजी खा बापूसाहेब तनपुरे यांच्यासमोरच जिप माजी अध्यक्...




राहुरी : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून वांबोरीचे राजकारण चांगलेच पेटलेले आहे. आजही माजी खा बापूसाहेब तनपुरे यांच्यासमोरच जिप माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे आणि प्रा. शामराव पटारे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी प्रा पटारे यांनी आम्हाला गोळ्या घालून मारा पण खोटे आरोप करू नका, अशी भूमिका घेतल्याने अंतर्गत राजकारण आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

     सध्या राजकारण जोमात सुरू आहे, कधी आहे कोव्हिडं सेंटरचा विषय तर कधी लसीकरण ..! या माध्यमातून राजकारण पेटते आहे.यातून आरोप-प्रत्यारोपही रंगल्याने वांबोरीकरांची मोठी करमणूक सुरू आहे. त्यात वांबोरी ग्रामपंचायतीच्या विविध कामे आणि त्याचा श्रेयवादाची फोडणी या राजकीय जंगलबंदीला मिळाली आहे. यात बाबासाहेब भिटे हेच सध्या गाव हाकत असल्याने यातूनही ठिणगी पडत आहे. वास्तविकता,  वांबोरी  ग्रामपंचायतीत काहींच्या बायका तर काहींच्या सुना सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. परंतु त्यांचे काम त्यांचे पतीच ग्रामपंचायतमध्ये येऊन बघतात. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक देखील नाराज आहेत. ही त्यात बाबासाहेब भिटे हेच ग्रामपंचायत चालवत असल्याचेही दुखणे आहे. ते सदस्य नसताना पत्नी ऐवजी ते कारभार पाहत असल्याने ही खदखद वाढत होती. त्यात आज माजी खा बापुसाहेब तनपुरे हे वांबोरीत आले असता त्यांच्या समोर ही नाराजी बाहेर आली. यावेळी काहींच्या बायका व सुना सदस्य आहेत, मात्र त्या येथे येत नाही तर त्यांचे पती आणि सासरे कारभार पाहतात, असा सूर बाहेर येत, हे चालते मग बाबासाहेब भिटे ग्रामपंचायतीत येऊन बसण्या बाबतच तक्रारी का होतात? असे भीटे समर्थकांनी विचारताच त्या बैठकीत उपस्थित असलेले प्राध्यापक शामराव पटारे यांनी आवाज वाढवत माझ्या सुने बद्दल काहीही बोलू नका, माझी सुन निवडून आल्यापासून मी ग्रामपंचायतीत आलो नाही आणि आमच्यावर बेछुट खोटे आरोप करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून एकदाच मारून टाका अशा शब्दात खासदार तनपुरे यांच्या समोरच भिटे यांचा प्रा पटारे यांनी समाचार घेतला, शिवाय भिटे यांनीही प्रत्युत्तर दिल्याने दोन कार्यकर्त्यांत कडाक्याची भांडणे जुंपल्याची पहायला मिळाली.अखेर तनपुरे यांनी दोघांना शांत करत या वादावर तूर्त पडदा टाकला मात्र ही धगधग कायम राहणार असून लवकरच याचा विस्फोट होईल, असे जाणकारांचे मत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत