कोपरगावात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर द दंडात्मक कारवाई - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर द दंडात्मक कारवाई

कोपरगाव/प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ मे पर्यंत 'ब्रेक दि चेन' धोरणांतर्गत कठोर निर्बंध ...

कोपरगाव/प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ मे पर्यंत 'ब्रेक दि चेन' धोरणांतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार कोपरगाव शहरातही त्याची पोलीस प्रशासन कडक अंमलबजावणी करता आहे. याबाबत शासनाने अथवा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी शनिवारी (ता.१५) दंडात्मक कारवाई करत ११५ व्यक्तींकडून २६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. तरी देखील नागरिक नियम पायदळी तुडवून संचार करताना दिसून येत आहे. परंतु, गेल्या वर्षापासून आरोग्य, महसूल विभागाबरोबर पोलीस थेट रस्त्यावर उतरून नियमांची अंमलबजावणी करत आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना विना मास्क आढळलेल्या १० व्यक्तींकडून प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे ५ हजार, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ३, कोटपा १, मोटार वाहन कायद्यानुसार दोघांवर कारवाई करून ४०० रुपयांचा दंड, सुरक्षित अंतराचे उल्लंघन केल्या प्रकरणी ९९ व्यक्तींकडून १९ हजार ८०० रुपये अशा एकूण ११५ व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्याने २६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. 


अजूनही नागरिकांनी गांभीर्याने घेऊन नियमांचे तंतोतंत पालन करून कोरोनाचा लढा यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत