सात्रळ(वेबटीम) सात्रळ येथील स्मशान भूमीत साफसफाई करून आणेराव कुटुंबियांनी वृक्षारोपण केले. सात्रळ येथील आणेराव कुटुंबात...
सात्रळ(वेबटीम)
सात्रळ येथील स्मशान भूमीत साफसफाई करून आणेराव कुटुंबियांनी वृक्षारोपण केले.
सात्रळ येथील आणेराव कुटुंबातील आजी शकुंतलाबाई यांचे नुकतेच 95 व्या वर्षी वृदापकाळाने निधन झाले. आपल्या लाडक्या आजीच्या स्मरणार्थ नातू सुधीर व युवक मित्रांनी स्मशान भूमी लची साफ सफाई करून आजीची आठवन राहावी म्हणून स्मशानात वृक्षारोपण केले. सध्या असलेल्या कोरोनाच्या भयाण परिस्थितीमुळे ऑक्सिजन ची भासणारी कमतरता यासाठी या युवक मंडळाने गावठाण तसेच स्मशानात वृक्षारोपण मोठया प्रमाणात करण्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात आज केली आहे.
या मोहिमेत संदीप रोकडे, सुधीर आणेराव, श्रीराम वाकचौरे, संतोष जोर्वेकर, विजय सुरशे, अशोक पडघलमल, योगेश घोडके आदि सहभागी होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत