'आय लव्ह कोपरगाव’चे सुशोभीकरणासाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'आय लव्ह कोपरगाव’चे सुशोभीकरणासाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन

कोपरगाव/प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ‘आय लव्ह कोपरगाव’ लोगोचा सेल्फी पॉईंट करुन त्याचे सुशोभीकरण करावे. या मागणीचे निवेदन शुक्रवारी (त...

कोपरगाव/प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ‘आय लव्ह कोपरगाव’ लोगोचा सेल्फी पॉईंट करुन त्याचे सुशोभीकरण करावे. या मागणीचे निवेदन शुक्रवारी (ता.27) ‘आय लव्ह कोपरगाव’च्या सदस्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, शहरातील हॉटेल वीरा पॅलेस समोरील हायमॅक्स असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी अथवा पालिकेस शक्य असेल तिथे ‘आय लव्ह कोपरगाव’ नामक लोगो तयार करुन सुशोभीकरण करावे. यामुळे शहराच्या वैभवात अजून भर पडेल आणि कोपरगावकरांसाठी अधिकाधिक अभिमानास्पद उपक्रम पालिकेच्या माध्यमातून होईल. शहरातील विकासकामांसोबत सुशोभीकरण देखील तितकेच महत्वाचे आहे. आय लव्ह कोपरगावच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, साहित्य या चार मूल्यांवर युवक काम करीत आहे. 


या संकल्पनेस पालिकेनेही हातभार आपण लावावा अशी मागणी आय लव्ह कोपरगावचे समन्वयक तुषार पोटे, शुभम गायकवाड, वासुदेव शिंदे, आकाश हलवाई, आदिनाथ कराळे, शुभम पाटणकर, आकाश जाधव, गौरव सानप, शुभम तांबे, सिद्धार्थ पाटणकर, वाल्मिक गोसावी, हृषीकेश गोसावी आदी सदस्यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक संदीप वर्पे, मंदार पहाडे, आकाश उपस्थित होते. त्यांनी देखील मागणी योग्य असल्याचे सांगून सोबत असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत