कोरोना रुग्णांसाठी ५१००० रुपयांची आर्थिक मदत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोना रुग्णांसाठी ५१००० रुपयांची आर्थिक मदत

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून कोरोना रुग्णांसाठी ५१००० रुपयांची आर्थिक मदत तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून कोरोना रुग्णांसाठी ५१००० रुपयांची आर्थिक मदत तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

  कोणत्याही संकट काळात केलेली मदत ही फार मोलाची असते.कोरोनाच्या काळात केलेली मदत रुग्णासाठी उपयोगी येईल ,केवळ शासकीय मदतीची वाट न पाहता समाजातील दानशूर घटकांनी मदती साठी पुढे आले पाहिजे असे आवाहन तहसीलदार योगेश  चंन्द्रे यांनी केले.

        कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.शासकीय अधिकारी आरोग्य व्यवस्था आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देत आहे.आरोग्यविभागाला साहित्याचा तुडवडा भासत आहे.या अनुषंगाने तालुक्यातील दुकानदारांनी एकत्र येऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जेवढी शक्य आहे ती मदत कोविड रुग्णासाठी देण्याचा निर्णय घेतला.

संघटनेचेच्या वतीने ५१०००/-रुपये निधी  तहसीलदार योगेश चंन्द्रे, डॉ. फुलसौंदर,डॉ.वैशाली आव्हाड यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पांडुरंग नरोडे, राजेंद्र गवारे,कैलास बोरावके,उत्तमराव चरमळ ,फकीर टेके,जनार्दन जगताप,रवींद्र बागुल, रवींद्र पोळ,सागर नरोडे,पप्पू बागुल, राजू होन आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत