राहूरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वळण गावांमध्ये दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अज्ञात इसमाने दगडफेक केल्याच्य...
राहूरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वळण गावांमध्ये दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अज्ञात इसमाने दगडफेक केल्याच्या चर्चाला उधान आले आहे.
अधिक समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील वळण गावात अवैध रीत्या दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी राहुरी पोलीस छापा टाकण्यासाठी गेले असता या ठिकाणी बसलेल्या अज्ञात व्यक्तीची आणि पोलिसात अज्ञात कारणावरून बाचाबाची झाली. याचं रूपांतर पुढे दगडफेकीत झालं या ठिकाणी दगडफेक झाल्याने पोलिसांनी याठिकाणहुन धुम ठोकली. माञ काही क्षणात या ठिकाणी पोलिसांचा ताफा दाखल झाला मात्र अज्ञात दगडफेक करणारी व्यक्ती पसार झाली.पोलिसांवर दगडफेक कुठल्या कारणातून झाली हे मात्र समजू शकले नाही याबाबत पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याशी संपर्क साधला असता पोलिसांवर हल्ला झाला नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .
कालच तांभेरे येथे दारू अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसमोर बाचाबाची झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा वळण येथे पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत