सर्वपक्षीयांनी मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा : मंगेश पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सर्वपक्षीयांनी मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा : मंगेश पाटील

कोपरगाव/प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणाचा निर्णय रद्दबातल केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कोपरगावचे माजी नगराध्यक्ष तथा ...

कोपरगाव/प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणाचा निर्णय रद्दबातल केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कोपरगावचे माजी नगराध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी सर्वपक्षीयांनी एकत्र येत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी योग्य भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने मराठा समाजातील शिक्षण आणि नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या युवक-युवतींची मोठी  निराशा करणारा आहे. परंतु कुणीही खचून न जाता कष्ट करून आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. आता  माध्यमांद्वारे समजलेल्या माहितीनुसार सकृतदर्शनी इतकेच म्हणता येईल की, मराठा समाजाची अवस्था समजून घेऊन राज्य सरकारने पुन्हा केंद्र सरकारला विनंती करून त्यांच्या अधिकारांमध्ये मराठा युवकांना व युवतींना न्याय मिळवून द्यावा.


 शेवटी आज कुठल्याही जाती धर्माचे जे युवा आहेत ते या देशाचे नागरिक आहेत. आणि जोपर्यंत ते  सक्षम होत नाहीत तोपर्यंत एका अर्थाने हा देश सुद्धा सक्षमपणे उभा राहणार नाही. २०१८ साली महाराष्ट्राच्या विधीमंडळात सर्वानुमते किंवा किंबहुना एकही मत विरोधात न जाता पारित झालेला मराठा आरक्षण कायदा किवा एसईबीसी हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. तरी मराठा समाजासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित बसून यावर योग्य तो कायदेशीर मार्ग काढून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, असे मंगेश पाटील म्हणाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत