अहमदनगर : प्रतिनिधी रेमिडीसिविर इंजेक्शनच्या पुरवठा आणि वितरणाबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज जिल्हाधिकारी व अन्य विभागाच्...
अहमदनगर : प्रतिनिधी
रेमिडीसिविर इंजेक्शनच्या पुरवठा आणि वितरणाबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज जिल्हाधिकारी व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कडक सूचना केल्या.आज जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विविध प्रशासकीय विभाग प्रमुख यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. हॉस्पिटलमध्ये लावण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांट संदर्भात नगरविकास विभागाद्वारे शिथिलता आणण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या बैठकीत राज्यमंत्री तनपुरे यांनी प्रशासनाला सूचना करताना,रेमडीसीवरचा मर्यादित साठा वितरीत करतेवेळी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले .हॉस्पिटलने वापरलेल्या रिकाम्या व्हायल जपून ठेवून त्याची नोंद महानगरपालिका आयुक्तांनी घेत इंजेक्शनचा काळा बाजार होणार नाही याची दक्षता घेण्याची कडक सुचना केली. निवेदनानुसार नगरविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागासह उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची त्वरित बैठक लावण्याचे आश्वस्त केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत