आ . काळे यांनी यापुढील ४ वर्षाचा स्थानिक विकास निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च करावा : अँड. पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आ . काळे यांनी यापुढील ४ वर्षाचा स्थानिक विकास निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च करावा : अँड. पोळ

  कोपरगांव  : प्रतिनिधी राज्यात गेल्या वर्षभरा पासून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवाव...

 

कोपरगांव  : प्रतिनिधी


राज्यात गेल्या वर्षभरा पासून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.यास कोपरगांव तालुकाही अपवाद राहिलेला नाही. कोपरगांव तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीने अक्षरक्ष: थैमान घातलेले असून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबातील वडीलधा-या नागरिकांसह तरुणांना प्राणास मुकावे लागले आहे.या परिस्थितीत गोरगरीब जनतेला कोरोनाच्या महामारीपासून वाचविण्यासाठी आमदारांनी यापुढील ४ वर्षाचा स्थानिक विकास निधी आरोग्य यंत्रणेशी संबंधीत असलेल्या वैद्यकीय उपकरणांवर व औषधोपचारावर खर्च करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितिन पोळ यांनी केली  एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


Regards,

आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव तालुक्याचे आ.मा आशुतोष काळे हे करोना साथीच्या अटकावा साठी शर्थीचे प्रयत्न करत आहे मात्र कोपरगांव तालुक्यात ग्रामीण रुग्णालयासह ६ प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी, दहिगांव बोलका, पोहेगांव, संवत्सर, टाकळी,वारी व ३२ प्राथमिक उपकेंद्र आहे.मात्र कोपरगांव ग्रामीण रुग्णालयात अद्यावत रुग्णवाहीका, ऑक्सिजन प्लांटसह वैद्यकीय उपकरणांची कमतरता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना देखील रुग्णवाहीकेंची गरज असून त्यांच्याही अनेक अडचणी असल्यामुळे त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्या सोडविणे गरजेचे आहे.यासाठी मागील काही दिवसांपूर्वी मा पालक मंत्री यांच्या उपस्थिती अनेकांनी मागणी केली याची आ.आशुतोष काळे यांनी तातडीने गंभीर दखल घेऊन त्या कशा सोडविता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सध्या राज्यात कोरोना सारख्या महामारीला सामोरे जाताना वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस व त्यांचे सहकारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे मात्र वैद्यकीय साहित्याच्या कमतरते मुळे त्यांचेही मनोबल खचले आहे.शासकीय आरोग्य केंद्र व कोवीड सेंटर येथेही आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीचा तुटवडा निर्माण झालेला असून रुग्णांना ऑक्सिजनसह, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर, रेमडेसीवीर इंजेक्शन,औषधे-गोळ्यांसह अँटीजन चाचण्या करण्यासाठी निर्माण झालेल्या टेस्टींग किटचाही तुटवडा गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात निर्माण झालेला दिसत असून या तुटवड्यामुळे रुग्णांच्या तपासण्या होऊ न शकल्यामुळेच सध्या रुग्णसंख्येत घट दिसत आहे,मात्र प्रत्यक्षात चाचण्याच कमी प्रमाणात होत असल्यामुळे हे प्रमाण कमी दिसत आहे यासाठीच आमदारांनी यापुढे कायम स्वरूपी उपाय योजना करून कृती कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. मागील काही दिवसांपूर्वी कोपरगाव ग्रामीण आरोग्य केंद्राला  उपजिल्हा रुग्णालय करावे अशी जनतेने मागणी केली होती त्यामुळे आ आशुतोष काळे यांनी आपला सर्व निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्यास व आवश्यक असलेली वैद्यकीय साधनसामुग्री आपल्या निधीतून तात्काळ उपलब्ध करुन दिल्यास आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना संशयीत रुणांच्या चाचण्या करणे व त्यांचेवर योग्य ते औषधोपचार करणे सोयीचे होऊन या महामारीला रोखण्यात मदत होईल असे वाटते.

या संकटसमयी तरी आमदारांनी यात विशेष लक्ष घालून कोपरगांव तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा असे या पत्रकात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत