देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरीत केवळ २६ कोरोना रूग्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरीत केवळ २६ कोरोना रूग्ण

  देवळाली प्रवरा प्रतिनिधी  राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वाता...

 देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथे 26 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. सोमवार व मंगळवार या दोन  दिवसात  केवळ 26 कोराना बाधित आढळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर राहूरी फॅक्टरी सोमवारी २ व्यक्तींचे कोरोनाने बळी घेतले आहे.

 राहूरी तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण सँख्या वाढत आहे. सोमवार ३ मे रोजी  तालुक्यात दिवसभरात 183  कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

 तर  देवळाली प्रवरात व राहूरी फॅक्टरीत गेल्या दोन दिवसात अवघे  26 कोरोना रूग्ण   आढळून आले आहेत. यामध्ये देवळालीत 16 तर फॅक्टरीत 10 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. 

तर सोमवारी राहूरी फॅक्टरी येथील एका पुरुषाचा तर वयोवृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे  रुग्ण संख्या घटली असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी.रुग्ण संख्या घटली म्हणून लगेच बाहेर पडू नये. कामानित्त बाहेर येणाऱ्या नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत