ग्रामीण भागात शेकडो रूग्णांना दिलासा देणारा तो "अंजिक्य" ठरतोय देवदूत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ग्रामीण भागात शेकडो रूग्णांना दिलासा देणारा तो "अंजिक्य" ठरतोय देवदूत

राहुरी/गोविंद फुणगे  जगभरात कोरोना आजाराने आहाकार माजवला आहे अहमदनगर जिल्ह्यात कोरणा रुग्णांनी तर उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर राहुरी तालुक...

राहुरी/गोविंद फुणगे



 जगभरात कोरोना आजाराने आहाकार माजवला आहे अहमदनगर जिल्ह्यात कोरणा रुग्णांनी तर उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर राहुरी तालुक्यासह ग्रामीण भागात देखील हजारो रुग्ण दररोज पुढे येत आहेत.अनेक ठिकाणी शासकीय यंत्रणा देखील कोलमडल्याचे समोर येत आहे. तर अनेकांना रूग्णालयात बेड, ऑक्सिजन,व्हेटींलेटर न मिळाल्याने शेकडो मृत्यू देखील होत आहेत. रूग्णालयातील लाखों रूपयांचा खर्च ऐकताच गोर-गरीब रूग्णांची माञ दमछाक होत आहे.हे सर्व सुरू असताना दुसरीकडे मात्र मानोरी पंचक्रोशीत रूग्ण सेवेसाठी सरसावलेला तो अवलियाने आरोग्य सेवेत आपल्याला झोकुन दिले आहे.कोरोना होण्याआधीच आता योग्य उपचार तथा मार्गदर्शन करून रूग्णांना धीर देऊन सकारी यंञनेकडे पाठविणारा तो "अंजिक्य" डाॅक्टर नसुन देवमाणूस असल्याच्या प्रतिक्रिया या ग्रामीण भागातून उमटत आहे.

       राहुरी तालुक्यातील मानोरी येथील डाॅ. अजिंक्य पोपट आढाव(MBBS) यांनी आपल्या अनुभव कौशल्याच्या जोरावर उपचारापुर्वीच योग्य मार्गदर्शन करून शेकडो रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. अनेक रुग्णांचे लाखो रुपये खर्च होणारे  देखील याच अजिंक्य ने वाचवले आहेत.आणि त्यांच्या या रूग्ण सेवे करीता त्यांची पत्नी डाॅ. रूपाली अजिक्य आढाव(BHMS) ह्यांनी देखील त्यांच्या खांद्यालाखांदा देत रूग्ण सेवेचा वसा हाती घेतला आहे.रूग्ण सेवा हिच खरी इश्वर सेवा म्हणून या दाम्पत्यातील आपल्याला या समाजकार्यात झोकुन दिलं आहे.राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील मानोरी येथील सुसंस्कृत शेतकरी कुटुंबात जन्मलेला अजिंक्य यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोरी येथे झाले तर विद्यालयीन शिक्षण हे अंबिका माध्यमिक विद्यालय मानोरी या ठिकाणी झाले असून राहुरी कॉलेज येथील कॉलेजचे शिक्षण तर वैद्यकीय शिक्षण पुणे येथे त्यांनी पूर्ण केले.

सुसंस्कृत घरात जन्मलेल्या डाॅ. चे आजोबा कचरू नाना आढाव,गाव तंटामुक्ती समिचे अध्यक्ष, वडील पोपट आढाव,माध्यमिक शिक्षकमधील चुलते,आप्पासाहेब आढाव,महाविद्यालयीय शिक्षक यांच्याकडुनच रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजुन लोकांना सेवा देण्याचे बाळकडु अजिक्यला घरातुन मिळाले.कुठलाही बडेजाव न करता अजिंक्यनी आपली वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यास कोपरगाव तालुका चासनळी आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती माञ पुढील शिक्षणासाठी त्यांनी आपला राजीनामा दिला.तोपर्यंत मार्च २०२० रोजी सर्वञ कोरोना आजार पसरला सध्या कोरोना मुळे होणारे मृत्यू, रूग्णालयातील लाखौ रूपयांचा खर्च बघता सरकारी यंञनेला देखील मदत म्हणून उपचारापुर्वीच रूग्णांना वैद्यकिय सल्ला देऊन योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी अजिक्य आढाव यांनी मानोरीत रूग्ण सेवा सुरू केली.बघता-बघता शेकोडोंची रीघ लागली असता पैशांचा मोह न बाळगता सेवा म्हणून त्यांनी हे कार्य पार पाडले.अन् गोर-गरीब नागरीकांचे लाखौ रूपये अन् जीव हि त्यांनी वाचवले असुन आपली सेवा अशीच अखंडीत पणे सुरू ठेवली आहे.त्यांची हातातुन अशीच सेवा घडो अशी दुवां अनेकांनी दिली आहे.अशी रूग्ण सेवा करणा-या या अवलियाला आमचा मनापासून सॅल्युट.

कोरोनाला घाबरू नये पण गांभीर्याने घ्यावे

       कोरोना आजाराला घाबरू नये.पणे हा आजार लपूनही ठेवु नये,गांभीर्य पुर्वक लवकरात लवकर डाॅक्टरांच्या सल्याने उपचार सुरू करावेत. आजार कुठलाही असला तर मनाने खंबीर रहावे घाबरून जाऊ नये.घाबरल्यामुळेच मृत्यूचे प्रमान वाढलेले समोर आले आहे.मनाने खंबीर रहावुन उपचार करून घ्यावेत कोरोना शंभर टक्के बरा होतो. माञ या कालावधीत रूग्ण व संपर्कात आलेल्या व्यक्तीनी पुर्ण पणे खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

डाॅ.अजिंक्य आढाव, एमबीबीएस, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत